आरामदायक काम सोडून एखादी रिस्क घेतल्यानंतरच ….
By
DAYANAND MOHITE | प्रकाशित:
नोव्हेंबर 22, 2019 03:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्राचीन काळी एक राजा आपल्या शेजारील राज्यामध्ये फिरण्यासाठी गेला. तेथील राजाने खूप चांगल्याप्रकारे पाहुण्या राजाचे स्वागत केले. काही दिवस राजा तेथे राहिला आणि पुन्हा आपल्या राज्यात जाण्यासाठी निघाला. त्यावेळी शेजारील राजाने दोन कबुतर राजाला भेट स्वरूपात दिले.
- राजा ते दोन्ही कबुतर घेऊन आपल्या महालात आला. महालात एका सेवकाला कबुतरांच्या देखभालीसाठी नियुक्त केले. सेवक सकाळ-संध्याकाळ कबुतरांसाठी दाणे आणि पाण्याची व्यवस्था करत होता. काही दिवसांनी राजा त्या कबुतरांना पाहण्यासाठी गेला.
- सेवकाने राजाला सांगितले की, एक कबुतर आकाशात उंच भरारी घेते परंतु दुसरे कबुतर झाडाच्या एका फांदीवरच बसून राहते. हे ऐकून राजा विचारात पडला की, दुसरे कबुतर उडत का नाही.
- राजाने लगेच आपल्या मंत्र्यांना बोलावून घेतले परंतु कोणालाही दुसरे कबुतर का उडत नाही याचे उत्तर देता आले नाही.
- तेवढ्यात एका मंत्र्याने सल्ला दिला की, पक्ष्यांची माहिती असलेल्या जाणकार व्यक्तीला बोलावून घ्यावे. मंत्र्याने लगेच एका गरीब शेतकऱ्याला बोलावून घेतले.
- या शेतकऱ्याला पक्ष्यांची माहिती होती. शेतकऱ्याने कबुतरच्या जवळपास असलेली जागा पाहिली आणि ज्या झाडाच्या फांदीवर कबुतर बसत होते ती फांदी तोडून टाकली.
- त्यानंतर दुसरे कबुतरही आकाशात उंच उडू लागले. शेतकऱ्याने राजाला सांगितले की, हे कबुतर या फांदीच्या मोहामध्ये अडकले होते, उडण्याची जोखीम घेण्यास घाबरत होते. ही फांदीच तोडून टाकल्यामुळे त्याच्याकडे उडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. यामुळे आता हे कबुतर उंच उडत आहे. हे पाहून राजा खुश झाला आणि शेतकऱ्याला सुवर्ण मुद्रा दिल्या.
कथेची शिकवण -: या कथेचा मूळ संदेश असा आहे की, जे लोक रिस्क घेण्यास घाबरतात, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू इच्छित नाहीत, ते उंच भरारी घेऊ शकत नाहीत म्हणजेच आपल्या कार्यक्षेत्राच्या शिखरापर्यंत पोहोचत नाहीत. तुम्हालाही काही मोठे करायायचे असल्यास रिस्क घ्यावी लागले, तेव्हाच तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात.