ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुख आणि दुखः फक्त आपल्या सवयी आहेत, दुखी राहण्याची सवय आपण आत्मसात केली आहे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुख आणि दुखः फक्त आपल्या सवयी आहेत, दुखी राहण्याची सवय आपण आत्मसात केली आहे

शहर : मुंबई

एका जुन्या लोककथेनुसार कोण्या एका गावातील एका घरात पती-पत्नी राहायचे. ते दोघेही नेहमी दुखी असायचे. त्यांच्या आयुष्यातील समस्या संपण्याचे नावच घेत नव्हत्या. त्यांना असे वाटाचे की, त्यांच्या आयुष्यात सुख कधीच येणार नाही. त्यांनी देवाची पुजा केली, अनेक मंदिरात जाऊन देवांच्या पाया पडले, पण त्यांना सकारात्मक फळ मिळत नव्हते. एके दिवसी ते आपल्या गावातील एका प्रसिद्ध संताकडे गेले.

त्या दोघांनी संताला आपल्या समस्या सांगितल्या. त्यांच्या समस्या ऐकताच संत अचानक उठले आणि आपल्या खोलीत गेले. तिथे त्यांनी एक खांब पकडला आणि जोर-जोराने ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून गावातील सगळे लोक जमा झाले. त्यांनी संताला काय झाले विचारले? संत म्हणाले, हा खांब मला सोडत नाहीये. मी काय करू?

त्यांचे बोलने ऐकून सगळो लोक हैराण झाले. त्यांना वाटले की, एक बुद्धीमान संत मुर्खाप्रमाणे का बोलत आहे. सगळे म्हणाले, खांबाने तुम्हाला नाही, तर तुम्ही खांबाला पकडले आहे. संत म्हणाले, बरोबर आहे. मला हेच समजून सांगायचे होते. सुख-दुख आपल्या सवयी आहेत. आपण दुखी राहण्याच्या सवयीला पकडले आहे, जोपर्यंत आपण या सवयीला सोडत नाहीत, तोपर्यंत आपण सुखी राहू शकणार नाहीत.

त्या दाम्पत्याला ही बाब लक्षात आली. आता त्यांनी ठरवले आहे , यापुठे सकारात्मक मार्गानेच आयुष्य जगायचे. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यातील दुख निघून गेले.

कथेची शिकवण या कथेची शिकवण ही आहे की, नकारात्मक बाबी आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि सकारात्मक गोष्टींचा अवलंब केला पाहीजे.

मागे

अडचणी दूर होण्याची वाट पाहात बसल्यास यश कधीही मिळणार नाही
अडचणी दूर होण्याची वाट पाहात बसल्यास यश कधीही मिळणार नाही

एका गावातील व्यक्ती दिवसभर शेतात काम करून कसेबसे आपल्या कुटुंबाचे पालनपोष....

अधिक वाचा

पुढे  

आपल्या जीवनात अनेकदा संधी येतात, पण ...
आपल्या जीवनात अनेकदा संधी येतात, पण ...

स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याशी निगडित अनेक प्रेरक ....

Read more