ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एक दार बंद झाले तर देव आपल्यासाठी दुसरे दार उघडतो, आपण खचून जाऊ नये

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 07:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एक दार बंद झाले तर देव आपल्यासाठी दुसरे दार उघडतो, आपण खचून जाऊ नये

शहर : मुंबई

एका शेठजीला रात्री झोप येत नव्हती. शेठजी खूप श्रीमंत होते. संपुर्ण कुटुंब सुखी होते. पण शेठजीला अस्वस्थ वाटत होते. त्यावेळी घरात ते एकटेत होते, सगळे कुटुंब दुसऱ्या नातेवाईकांकडे गेले होते. रात्रीचे अडीच वाजले होते. पण त्यांचे मन शांत होत नव्हते. शेठजीने वाटले घराजवळच्या मंदिरातून फेरफटका मारून येतो. कदाचित देवाच्या दर्शनाने मन शांत होईल.

काही वेळातच ते मंदिराजवळ पोहचले. जेव्हा शेठजी मंदिरात गेले तेव्हा त्यांना दिसले की एक वृद्ध व्यक्ती देवासमोर बसून रडत होता. शेठजी त्या वृद्धाजवळ गेले आणि विचारले बाबा तुम्ही कोण आहात आणि का रडताय? वृद्धाने सांगितले की शेठजी मी खूप गरीब आहे. माझी पत्नी आजारी आहे आणि रूग्णालयात दाखल आहे. तिच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. जर डॉक्टरला पैसे नाही दिले तर तो माझ्या पत्नीचे ऑपरेशन करणार आही. मला कळत नाही पैशांची व्यवस्था कशी करू.

शेठजी म्हणाले तुम्ही काळजी करू नका. तुमच्या पत्नीच्या उपचारासाठी मी पैसे देईल. शेठजीने लगेच आपल्या खिशातील सर्व पैसे काढून त्यांना दिले. पैसे पाहुन तो व्यक्ती खूश झाला आणि शेठजीचे आभार मानू लागला. शेठजी म्हणाले की आता माझ्याजवळ एवढेच पैसे आहेत, जर तुम्हाला आणखी पैसे हवे असतील तर माझे घर जवळच आहे. आपण माझ्या घरी चला.

वृद्ध माणूस म्हणाला की शेठजी एवढे पैसे पुरेसे आहेत, तुमच्यामुळे माझ्या पत्नीचा उपचार होईल, पैसे घेऊन तो व्यक्ती लगेच मंदिरातून निघून गेला. गरजू लोकांची मदत करून शेठजीचे मन आता शांत झाले होते. त्यांनी देवाला प्रणाम केला आणि विचार करू लागले की कदाचित मी याच कारणामुळे झोप लागत नव्हती. देवाला माझ्याद्वारे या गरीबाची मदत करायची होता. घरी येऊन शेठजीला निवांत झोप लागली.

कथेची शिकवण -: जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. जेव्हा एक दार बंद होते तेव्हा देव आपल्यासाठी दुसरे दार उघडतो. धैर्य ठेवा आणि प्रामाणिकपणे आपले काम करत रहा. देव आपली नेहमी मदत करतो. या कथेची आणखी एक शिकवण म्हणजे आपण नेहमी गरजूंच्या मदतीसाठी तयार रहायला पाहिजे. आपण केलेली एखादी छोटीशी मदत दुसऱ्यासांठी अनमोल ठरू शकते. म्हणून कधीही कोणाची मदत करायला पाहिजे.

 

 

मागे

लोभापोटी आपल्याला मिळालेली संधी गमावू नका...
लोभापोटी आपल्याला मिळालेली संधी गमावू नका...

एका गावात खूप गरीब माणूस राहत होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. तो दररोज आपल्य....

अधिक वाचा

पुढे  

मरणा
मरणा

मरणा, भेट रे अध्ये मध्ये, भेटतोस ते ही बर आहे बघ..... तू भेटला नसतास तर , कुठे अन ....

Read more