ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विनाकारण कोणालाही वाईट बोलू नये

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विनाकारण कोणालाही वाईट बोलू नये

शहर : मुंबई

नदीच्या काठावर एक आश्रम होता. तेथे गुरु आपल्या शिष्यांसोबत राहत होते. शिष्य दररोज नावेतून नदी पार करून गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जात होते. या भिक्षेतूनच आश्रमातील लोकांना जेवण मिळत होते. एके दिवशी एक शिष्य नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी निघाला आणि नाविकाला नदीच्या पलीकडे घेऊन जाण्यास सांगितले.

त्याचवेळी तेथे एक शिपाई आला. त्यानेही नाविकाला नदीच्या पलीकडे घेऊन जाण्यास सांगितले. नावेमधून एका वेळी एकच व्यक्ती नदीच्या दुसऱ्या बाजूला जाऊ शकत होता. नाविक म्हणाला- शपाई साहेब, हे संन्यासी आहेत, दररोज गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जातात यामुळे यांना पहिले सोडून येतो आणि नंतर तुम्हाला घेऊन जातो.

शिपायाला आपल्या पदाचा खूप गर्व होता. त्याला वाटले की, या सन्याशामुळे मला वाट पाहावी लागेल. असा विचार करून त्याने त्या संन्याशाला अपशब्द बोलणे सुरु केले. संन्यासी गुपचूप सर्वकाही ऐकत राहिला. त्याने शिपायाच्या अपशब्दांचे काहीच उत्तर दिले नाही. नाविक हे सर्वकाही पाहत होता.नाविकाला हा प्रकार बघवला नाही आणि तो शिपायाला म्हणाला, तुम्ही या संन्याशी व्यक्तीला शिव्या देणे बंद करा. मी तुम्हालाच पहिले सोडून येतो. हे ऐकून शिपायाच्या चेहऱ्यावर असे भाव निर्माण झाले, जसे काही त्याने एखादे युद्ध जिंकले आहे. नाविक नदीच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर अचानक वादळ आले आणि नाव पलटली.नाविकाने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला परंतु शिपाई नदीमध्ये बुडाला. शिष्याने ही बातमी गुरूंना सांगिलती. गुरु म्हणाले- तू शिपायाच्या अपशब्दांचे उत्तर का नाही दिलेस? शिष्य म्हणाला- तुम्हीच तर असे करण्यास मनाई केली आहे. गुरु म्हणाले- तू त्याला काही बोलला असतात तर त्याचा मृत्यू झाला नसता आणि तो केवळ जखमी झाला असता.


अनेक लोकंना विनाकारण इतरांना वाईट बोलण्याची सवय असते. अशा लोकांना हे माहिती नसते की, त्यांनी केलेल्या क्रियेची प्रतिक्रिया त्यांनाही अवश्य मिळणार असते. यामुळे कधीही कोणालाही विनाकारण वाईट बोलू नये.

मागे

मनःशांती
मनःशांती

एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या....

अधिक वाचा

पुढे  

लक्ष्य गाठण्यासाठी हजारो निघतात परंतु पोहोचतो एखादाच व्यक्ती
लक्ष्य गाठण्यासाठी हजारो निघतात परंतु पोहोचतो एखादाच व्यक्ती

एका गुरुचे दोन आश्रम होते. एक शहरात आणि एक गावामध्ये. गुरु शहरातील आश्रमात र....

Read more