ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

यशाचे सूत्र : कधी-कधी अडचण लहान असते, पण आपणच त्याला मोठे संकट समजतो

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 08:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

यशाचे सूत्र : कधी-कधी अडचण लहान असते, पण आपणच त्याला मोठे संकट समजतो

शहर : मुंबई

एका लोककथेनुसार पुरातन काळा एका शेतकऱ्याच्या शेतात एक दगड फसलेला होता. त्या दगडाच्या ठेचेमुळे त्याला अनेकवेळा दुखापत झाली होती. तो दगड अनेक दिवसांपासून तेथेच फसलेला होता. शेतीची कामे करताना दगडामुळे अनेकवेळा शेतीच्या अवजारांचे नुकसान होत होते. शेतकऱ्याला वाटायचे हा दगड खूपच मोठा असेल. यामुळे याला येथून हटवणे शक्य होणार नाही. असाच विचार करत अनेक वर्ष निघून गेले.

एकेदिवशी शेतात काम करत असताना दगडामुळे शेतकऱ्याचा नांगर तुटला. यामुळे शेतकऱ्याला राग अनावर झाला. दगडामुळेच दरवेळी नुकसान होत असल्याचे शेतकऱ्याने दगडाला काढून टाकण्याचा विचार केला. शेतकऱ्याने आपल्या गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले. सर्वजण दगड काढण्याच्या तयारीला लागले.

सर्वांना वाटत होते की दगड खूप मोठा आहे. याला येथून हटविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार. पण काही वेळातच दगड जमिनीतून बाहेर आला. हे पाहून सर्वजण हैराण झाले. कारण त्यांनी विचार केला तितका तो दगड मोठा नव्हता. शेतकऱ्याला आनंदही झाला आणि स्वतःवर हसू आले. त्याने विचार केला की, हा तर लहान दगड होता. मी एकटा देखील याला हटवू शकत होतो. मी माझ्या विचारामुळे या लहान अडचणीला मोठे मानले होते. यामुळे माझे बरेच नुकसान झाले.

कथेची शिकवण

 या गोष्टीतून शिकवण अशी की, कधी-कधी आपण लहानतल्या लहान अडचणींना मोठे संकट समजतो. त्या अडचणींपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः नुससाचा सामना करतो. आपण जर अडचणींचा सामना केला तरच समस्या दूर होऊ शकतात.

Recommended Articles

मागे

मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !
मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !

एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्र�....

अधिक वाचा

पुढे  

राग आल्यावर मौन राहायला हवे, यामुळे आपण कटु बोलण्यापासून वाचतो
राग आल्यावर मौन राहायला हवे, यामुळे आपण कटु बोलण्यापासून वाचतो

एका पौराणिक कथेनुसार, एक शांती नावाची महिला होती, पण ती अत्यंत रागीट स्वभावा....

Read more