By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 12:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अडचणी आणि आव्हाने जीवनाचा एक भाग आहेत. असा एकही मनुष्य नाही ज्याने जीवनात कधी अडचणींचा किंवा आव्हानाचा सामना केला नाही. काही लहान-लहान गोष्टी थेट आपल्या जीवनाला प्रभावित करत असतात. भगवान शंकराने शिव पुराणात अडचणींचा सामना करण्यासाठी काही महत्वाते सुत्र दिले आहेत. आपण जर या सुत्रांचा आधार घेतला तर जीवनात येणाऱ्या अडचणींचा आपण सहजरित्या सामना करू शकतो.
हे आहेत ते सात सुत्र
नेहमी खरे बोलावे
सत्य बोलण्याचा निश्चय करा. शक्य होईल तितके खरे बोला. स्वतः विजय मिळविण्याचा हा एक साध आणि सोपा मार्ग आहे. सत्य बोलण्यामुळे तुम्ही कधी, केव्हा आणि कोणासमोर काय बोलला आहात हे लक्षात ठेवायची आवश्यकता नसते.
सुलभतेगे वागा विनयशीलता व्यक्तित्वाचा अलंकार असतो. सरळ आणि सुलभ होण्यामुळे दुसऱ्यांसोबत व्यवहार करताना सोपे होईल. तुमच्या बोलण्यात एक वेगळात प्रवाह असेल. लोक तुमच्या बोलण्यामुळे प्रभावीत होतील.
निंदा करू नका कोणचे बोलणे चांगले वाटत नसेल तर त्यातील आपले स्वारस्य काढून घ्या. आपल्याला त्यापासून वेगळे करा. पण त्याची निंदा करू नका. केलेली निंदा तुमच्या व्यक्तित्वाचा प्रभाव कमी करते.
पवित्रता राखून ठेवा पवित्रतेचा संबंध फक्त बाहेरील शरीराशी नसतो. आपले मन, आपली आत्मा तसेच आपल्या शरीराला पवित्र ठेवा. यासाठी मंत्रजाप. उपवास सत्संग करा.
मौन साधण्याचा प्रयत्न करा बोलणे ही आपली गरज असायला हवी. पण सध्या बोलणे ही आपली सवय झाली आहे. दररोज थोड्या वेळासाठी मौन साधण्याचा संकल्प करा. शांत बसणे आणि मौन साधणे यांमध्ये फरक आहे. शांत बसणे हे शरीराबाहेरील आहे तर मौन राहणे हा आपल्यातील आहे.
उदारता ठेवा आपल्या एखाद्या गोष्टीमुळे कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. स्वभावात उदारतेचा भाव असेल तर आपण तेच बोलू आणि करू जे समोरच्याला चांगले वाटेल.
संकल्प करा एखादी चांगली गोष्ट जीवनात उतरवा. आचरणात एखादा दोष असेल तर त्याला सोडून द्या. संकल्प करून एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरूवात करा. चांगल्याची सुरुवात झाल्यास दोष स्वतःहून नाहिसा होतो
पुरातण लोककथेनुसार एक राजाच्या मुलीच्या मनात वैराग्याची भावना होती. राजकु....
अधिक वाचा