By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 05:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एका गावामध्ये एक शेतकरी शेतामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करत होता. त्याचे संपूर्ण कुटुंब कमी पैशांमध्ये खूप सुखी होते कारण त्यांच्या गरजा कमी आणि सीमित होत्या. एकदा गावामध्ये दुष्काळ पडला. पाऊस न पडल्यामुळे पीक वाळू लागले.
शेतकऱ्याच्या जमिनीला जोडूनच सावकाराची जमीन होती. सावकार त्या जमिनीचा कोणताही उपयोग करत नव्हता, जमीन पडीक पडलेली होती. सावकाराच्या जमिनीत एक विहीरसुद्धा होती, जी शेतकऱ्याच्या जमिनीपासून जवळ होती.
एके दिवशी शेतकरी सावकाराकडे गेला आणि त्याने सावकाराला त्याची विहीर विकत मागितली. शेतकरी म्हणाला यामुळे माझे पीकही वाचेल आणि तुम्हालाही फायदा होईल. परंतु सावकार लालची होता, थोडावेळ विचार करून त्याने एक निश्चित रक्कम घेऊन शेतकऱ्याला विहीर विकली. विहीर मिळाल्यामुळे शेतकरीसुद्धा खुश होता.
दुसऱ्या दिवसापासून शेतकरी विहिरीतील पाणी शेतासाठी वापरू लागला. तेवढ्यात तेथे सावकार आला आणि म्हणाला मी तुला फक्त विहीर विकली होती, विहिरीतील पाणी नाही. तुला विहिरीतील पाणीही हवे असेल तर आणखी जास्त पैसे द्यावे लागतील.
सावकाराचे बोलणे ऐकून शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सावकाराला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु सावकार तयार झाला नाही. शेतकऱ्याच्या लक्षात आले की, सावकार खूप लोभी व्यक्ती आहे. शेवटी शेतकरी घरी निघून आला. पत्नीने शेतकऱ्याला उदास पाहून कारण विचारले. शेतकऱ्याने पत्नीला काय घडले ते सर्वकाही सांगितले.शेतकऱ्याची पत्नी म्हणाली- उद्या मी तुमच्यासोबत शेतामध्ये येते. दुसऱ्या दिवशी ते दोघेही शेतामध्ये गेले, सावकारही तेथेच होता. शेतकऱ्याची पत्नी सावकाराला म्हणाली- हे तर खरं आहे की, तुम्ही आम्हाला फक्त विहीर विकली आहे, त्यातील पाणी नाही. आता आम्हाला विहिरीतील पाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या विहिरीतील पाणी काढून घ्या आणि आम्हाला फक्त विहीर द्या. सावकार म्हणाला- हे अशक्य आहे? विहिरीतून पाणी कसे काढता येणार? जेवढे पाणी काढेल तेवढेच पाणी पुन्हा विहिरीत येईल.
शेतकऱ्याची पत्नी म्हणाली- ठीक आहे मग, तुमचे पाणी आमच्या विहिरीत आहे, यामुळे तुम्हाला याचे भाडे द्यावे लागेल. सावकाराच्या लक्षात आले की, शेतकऱ्याची पत्नी हुशार आहे आणि आपलेच नुकसान होऊ शकते. यामुळे सावकाराने स्वतःची चूक मान्य केली आणि निघून गेला.
अनेकवेळा आपण एखाद्या अडचणीसमोर गुढघे टेकतो. आपल्याला वाटते की, या अडचणीवर कोणताही मार्ग नाही परंतु असे नसते. तुमच्याकडे त्या अडचणीचे उत्तर नसेल तर जवळपासच्या लोकांचा सल्ला घ्यावा. कोणता न कोणता मार्ग नक्की निघतो.
प्राचीन काळी एक राजा आपल्या शेजारील राज्यामध्ये फिरण्यासाठी गेला. तेथील रा....
अधिक वाचा