ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुखाची रेसीपी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 22, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुखाची रेसीपी

शहर : मुंबई

सुुुख

किती सहज म्हणतोस रे ...

म्हणे एक प्लेट सुख आण पट्कन ..........

बाजारात जा आणि

सहनशक्ती घेऊन ये बरं झटकन .........

असे काही नसते रे बाबा.

 

सुखाची रेसीपी

भिजत घालेन काही वेळ

संयमाच्या पाण्यात.

बांधून घालेन काही काळ

घट्ट ओठांच्या फडक्यात.

 

दुर्लक्षाच्या उबेमध्ये

छान मोड येतील.

सुखाचे ताजे ताजे

कोंब दिसू लागतील.

 

माया आणि आपुलकीचा

फर्मास मसाला.

कष्ट आणि मेहनतीचा

खर्डा घालू चवीला.

 

परस्पर स्नेहाचं

खोबरं घालू छानसं.

बंधन आणि मर्यादांचं

मीठ घालू इवलुसं.

 

साखरपेरणी करू थोडी

गोड गोड शब्दांची.

कोथिंबीर घालू थोडी

आस्था आणि समजुतीची.

 

कटू शब्द, राग, लोभ

चुलीमध्ये घालू.

स्वार्थ आणि गैरसमज

भाजूनच काढू.

 

तयार झाली डिश आपली

सजवायला घेऊ.

तृप्ती आणि कौतुकाची

साय घालू मऊ.

 

बघितलंस ??

सुख ही डिश नाही

एकट्याने शिजवायची,

सर्वांनीच रांधायची नि सर्वांनीच मिळूनच खायची..

मागे

राग आल्यावर मौन राहायला हवे, यामुळे आपण कटु बोलण्यापासून वाचतो
राग आल्यावर मौन राहायला हवे, यामुळे आपण कटु बोलण्यापासून वाचतो

एका पौराणिक कथेनुसार, एक शांती नावाची महिला होती, पण ती अत्यंत रागीट स्वभावा....

अधिक वाचा

पुढे  

नकारात्मक विचार करू नका!
नकारात्मक विचार करू नका!

एकदा एक व्यक्ती, दोरीने बांधलेला हत्ती घेऊन जात होता. दुसरा माणूस ते पाहत हो....

Read more