ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

व्यसने आपल्याला नव्हे, आपणच व्यसनांना धरून ठेवतो

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

व्यसने आपल्याला नव्हे, आपणच व्यसनांना धरून ठेवतो

शहर : मुंबई

आपल्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टी काढून जीवनाचे नंदनवन बनवणे अगदी सोपे आहे. वाईट गोष्टी सोडायला सुरुवात करा. दुस-या कोणाच्या भरोशावर तुम्ही तुमच्यातल्या वाईट सवयी काढून टाकू शकत नाही. यासाठी दृढसंकल्पाची आवश्यकता असते. आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनातील एक सत्यघटना येथे देत आहोत. दृढ विश्वास आणि संकल्प यांचे महत्त्व या घटनेतून आपल्या ध्यानात येऊ शकेल.

आचार्य विनोबांकडे एकदा एक दारूडा तरुण आला. हात जोडून विनवणी करू लागला. मी खूप दु:खी आहे. मला दारूने घेरले आहे. दारू सोडायची माझी तीव्र इच्छा आहे, पण दारू सुटत नाहीय. आपण काहीतरी उपाय सांगा. विनोबाजींनी थोडा विचार केला आणि दुस-या दिवशी भेटीस बोलावले.

दुस-या दिवशी तो तरुण सकाळी लगबगीने आला. त्याने विनोबाजींना हाक दिली. विनोबा म्हणाले अरे आत ये. त्याला आश्चर्य वाटले. विनोबा एका खांबाला घट्ट पकडून उभे होते. तरुणाने जिज्ञासेने असे करण्याचे कारण विचारले. विनोबा म्हणाले, अरे या खांबाने मला पकडून ठेवले आहे. कितीतरी वेळ झाले पण खांब मला सोडत नाहीय. तरुणाला आश्चर्य वाटले आणि हसूही आले. तरुण म्हणाला, खांबाला तर तुम्ही स्वताच पकडले आहात. तुम्ही खांबाला सोडा म्हणजे आपोआप तुमची सुटका होईल.

विनोबा हसले. तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बाळ मी हेच तर तुला सांगणार होतो. दारूला तू कवटाळून बसलास. तू ठरवलास तर तुझे व्यसन सुटू शकेल.तरुणाचे डोळे उघडले. त्याने दृढनिश्चय केला आणि त्याचे व्यसन सुटले. तुम्हालाही कोणत्यातरी व्यसनाने घेरले आहे असे वाटत असेल तर आज आणि आताच दृढ निश्चय करा.

 

मागे

शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!
शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!

आपल्या जीवनात वेळेला खूप महत्व आहे. वेळेचा उपयोग एखादा मनुष्य कशा रीतीने कर....

अधिक वाचा

पुढे  

खुश कावळा
खुश कावळा

एक इट नावाचे खेडे होते. त्या खेड्यात सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत असे. त्या....

Read more