ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जे भाग्यात असते तेच लाभते

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 01:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जे भाग्यात असते तेच लाभते

शहर : मुंबई

एका गावात सोमिलक नावाचा कष्टाळू कोष्टी होता. तो तलम कापड विणण्यात पटाईत होता. पण कष्ट भरपूर करूनसुद्धा अपेक्षित मोबदला त्याच्या हाती येत नव्हता. त्याच्या बरोबरचे इतर कोष्टी जाडंभरडं कापड विणूनसुद्धा भरपूर पैसा कमवित होते. तेव्हा सोमिलकाने दुसर्या गावी जाऊन धंदा करण्याचे ठरविले. पण सोमिलकाची बायको त्याला म्हणाली, ''कशाला उगाच दुसर्या गावात जाता.... आपल्या नशिबात भरपूर पैसा मिळणार असेल तर याच ठिकाणी कापड विणून मिळेल. पण नशिबात जर नसेल तर दुसर्या गावी जाऊनही उपयोग काय?'' तरी हट्टाने सोमिलक दुसर्या गावी जातो. भरपूर कष्ट करतो आणि तिनशे मोहरा कमावतो.

त्या मोहरा घेऊन आपल्या गावी येण्यास निघतो. दमल्यामुळे एका झाडाखाली विश्रांती घेता घेता त्याला झोप लागते. थोड्यावेळाने दोन माणसांच्या संभाषणाच्या आवाजामुळे झोप उडते. त्या दोघांचे संभाषण सोमिलक ऐकतो.

''अरे, कर्त्या... सोमिलकाने आता तीनशे मोहरा कमावल्या पण त्याच्या नशिबात फक्त अन्नवस्त्रापुरताच पैसा आहे'' कर्म विचारतो. त्याबरोबर कर्ता उद्गारतो, ''त्याने कष्ट केले त्याचे फळ मी दिले. ते फळ त्याच्याकडे ठेवायचे की नाही हे तुझं काम!''

ते दोघेजण सोमिलकाचे कर्म आणि कर्ता असतात. सोमिलक पूर्ण जागा होऊन आपली मोहरांची पिशवी बघतो तर ती रिकामी असते!

तात्पर्य : जे भाग्यात असते तेच मिळते.

मागे

स्वत:चा नाश
स्वत:चा नाश

एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगा....

अधिक वाचा

पुढे  

त्यात अशक्य काय आहे?
त्यात अशक्य काय आहे?

बादशहा, दरबारी मंडळी आणि बिरबल असे सर्व लोक एकदा यमुनेचया वाळवंटात फिरायला ....

Read more