By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 04:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एका गुरुचे दोन आश्रम होते. एक शहरात आणि एक गावामध्ये. गुरु शहरातील आश्रमात राहत होते. गावातील आश्रम त्यांनी एका वृद्ध साधूकडे दिला होता. एके देवाशी गावातील आश्रमाची देखभाल करत असलेल्या साधूंची तब्येत बिघडली.साधूने शहरातील आश्रमात निरोप पाठवला की, येथील आश्रमासाठी एखादा नवीन उत्तराधिकारी पाठवावा. त्या व्यक्तीकडे मी आश्रमाची जबाबदारी सोपवले. हा निरोप शहरातील गुरूंना समजल्यानंतर त्यांनी आपल्या 10 शिष्यांना आश्रमात पाठवले.
गावातील आश्रमासाठी एक व्यक्तीची आवश्यकता असताना गुरुजीने 10 शिष्यांना पाठवल्यामुळे सर्व शिष्य चकित झाले. एका शिष्याने याविषयी गुरूंना विचारले. गुरु शिष्याला म्हणाले- त्या 10 शिष्यांमधील एकच शिष्य आश्रमापर्यंत पोहोचेल, इतर शिष्य रस्त्यामध्येच थांबतील.
10 शिष्य गावामधील आश्रमाकडे जात असताना रस्त्यामध्ये त्यांना एक नगर लागले. तेथे अनेक लोक एकत्र जमा झाले होते. त्या शिष्यांना पाहून गावकऱ्यांनी विचारले, आमच्या गावातील मंदिराच्या पुजाऱ्याचे निधन झाले आहे. तुमच्यापैकी कोणी या मंदिराचा पुजारी होईल का? त्यामधील एक शिष्य पुजारी होण्यासाठी तयार झाला.
दुसरे नगर आल्यानंतर तेथील राजाच्या मूळचे लग्न होणार होते. राजाच्या सैनिकांनी 3 शिष्यांना लग्नामध्ये पुरोहित बनण्यासाठी थांबवले. अशाचप्रकारे कोणत्या न कोणत्या कारणामुळे इतर शिष्यही कमी होत गेले. शेवटी एकच शिष्य गावातील आश्रमात पोहोचला.ही बातमी शहरातील आश्रमात राहत असलेल्या शिष्यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंना असे कसे घडले, इतर शिष्य कुठे गेले असा प्रश्न विचारला? गुरु म्हणाले- असेच घडते, हा maza वयक्तिक अनुभव असल्यामुळे मी येथून 10 शिष्यांना पाठवले होते.
जेव्हा अनेक लोक मिळून एकाधे काम करतात त्यामधील अनेकजण स्वार्थ किंवा एखाद्या गरजेपोटी ते काम मध्येच सोडून देतात. फार कमी लोक लक्ष्यापर्यंत पोहोचतात
नदीच्या काठावर एक आश्रम होता. तेथे गुरु आपल्या शिष्यांसोबत राहत होते. शिष्य ....
अधिक वाचा