By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बादशहा, दरबारी मंडळी आणि बिरबल असे सर्व लोक एकदा यमुनेचया वाळवंटात फिरायला गेले, तेव्हा सहज म्हणून बादशहाने यमुनेच्या स्वच्छ रेतीत हातातील काठीने एक रेषा काढली. नंतर बरोबरच्या मंडळीकडे पाहून तो म्हणाला, ''या रेषेला अगदी थोडाही स्पर्श न करता, आपणापैकी कोणी तिला लहान करून दाखवील का?''
बिरबल वगळता सर्वजण म्हणाले, '' खाविंद, ते कसे शक्य आहे?'' ''त्यात अशक्य काय आहे?'' असे म्हणून बिरबलाने बादशहाने आधी काढलेल्या रेषेजवळच तिला समांतर अशी तिच्यापेक्षा लांब रेषा काढली व मग बादशहाने काढलेल्या रेषेकडे त्याचे लक्ष वळवून बिरबल म्हणाला, ''खाविंद, पाहा बरे, मी काढलेल्या लांब रेषेमुळे तुमची रेषा एकदम लहान वाटू लागली का नाही? शिवाय तुमची अट पाळून.'' > बिरबलाच्या या युकतीवर बादशहा एकदम खूष झाला.
एका गावात सोमिलक नावाचा कष्टाळू कोष्टी होता. तो तलम कापड विणण्यात पटाईत होत....
अधिक वाचा