ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बंगाली खिचडी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बंगाली खिचडी

शहर : मुंबई

साहित्य -: 100 ग्रॅम तांदूळ, 50 ग्रॅम मूग डाळ, 2 बटाटे, 1 लहान कोबी, 100 ग्रॅम आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे, 1/2 हळद, 1/2 साखर, 2 लाल मिरच्या, 1/4 चमचा जिरं, हिंग, 4 लवंगा, 2 वेलदोडे, 1 तुकडा कलमी, 2 तेजपान, 3 मोठे चमचे तूप.

कृती -: बटाट्याचे सालं काढून त्याचे लांब लांब तुकडे करून घ्यावे. कोबीचे मोठे तुकडे करावेत. आले हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावात. तांदळाला स्वच्छ धुऊन टाकावे. डाळींना तूप घालता गुलाबी होईस्तोर परतून घ्यावे. नंतर त्यात तूप, लाल मिरच्या, जिरं हिंग सोडून बाकी सर्व साहित्य टाकून 1/2 लीटर पाणी घालून गॅसवर 1/2 तास शिजत ठेवावे. मधून मधून त्याला पळीने हालवत राहावे. शिजून झाल्यावर खाली उतरवून घ्यावे. सर्व्ह करताना तूप गरम करून त्यात वरून लाल मिरच्या, जिरं हिंगाची फोडणी द्यावी.

मागे

शेंगा फ्राय
शेंगा फ्राय

साहित्य -: ८ ते १० शेवग्याच्या शेंगा, १ चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीप्र....

अधिक वाचा

पुढे  

स्टीम्ड चिकन
स्टीम्ड चिकन

साहित्य -: 1 देशी चिकन, चवीनुसार मीठ. सॉससाठी साहित्य -: एक लहान चमचा लसणाची पे....

Read more