By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 07:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -:
१०० ग्रॅम भावनगरी शेव, दोन कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमाचा गरम मसाला, दान चमचे तेल, हळद, मीठ, हिंग व राई गरजेप्रमाणे.
कृती -:
प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांना मध्ये छेद देऊन त्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करावे आणि त्यात हिंग, राई, कढीपाला, मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात मीठ, हळद, लाल तिखट व गरम मसाला घालून कांदा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यावा. आता त्यात भावनगरी शेव घालून चांगली हलवून घ्यावी. शेवटी थोड्या पाण्याचा हबका मारून हलकी वाफ काढावी. चवीला थोडी साखर व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. ही भाजी गरम गरम असताना त्यावर दही घालूनही खाता येते.
साहित्य -: अर्धा किलो टोमॅटो (मात्र हे सुकलेले, जुने नकोत. ते छान लाल आणि चवील....
अधिक वाचा