By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 04:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -:
* १०-१२ बोंबील
* १ वाटीभर आलं- लसूण- कोथिंबिरीची पेस्ट
* चमचाभर हळद
* २ चमचे तिखट
* तांदळाचा बारीक रवा २ वाटी
* तळण्यासाठी तेल, मीठ.
कृती -:
सर्वप्रथम बोंबील डोक्याकडून कापून घेऊन उभा चिरून काटय़ाकडून फ्लॅट करून घ्यावा. धुऊन मीठ लावून ठेवावा. नंतर दाबून सर्व पाणी काढून टाकावं. त्याला हळद, तिखट, आलं- लसूण- कोथिंबीर पेस्ट थोडं तेल घालून लावावं. तेल लावल्याने मसाला बोंबिलाला व्यवस्थित लागतो. गॅसवर तवा ठेवून गरम झाल्यावर तेल घालावं व गरम तेलात बोंबील रव्यात घोळवून त्यावर टाकावा. नंतर गॅस कमी करून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावा.
साहित्य -: सुरमई १ किलो, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ मोठे कांदे, अर्धी वाटी कोथि....
अधिक वाचा