ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेवग्याच्या शेंगांची भजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 07:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेवग्याच्या शेंगांची भजी

शहर : मुंबई

साहित्य -:

शेवग्याच्या शेंगेचे आठ-दहा उकडून घेतलेले तुकडे, बेसन १/२ वाटी, तांदळाचं पीठ १ मोठा चमचा, लाल तिखट १ मोठा चमचा, गरम मसाला १ लहान चमचा, हळद १/४ लहान चमचा, ओवा १/४ लहान चमचा, हिंग १/४ लहान चमचा, कोथिंबीर बारीक चिरलेली २ लहान चमचे, मीठ चवीनुसार, पाणी गरजेनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती -:

शेंगांचे तुकडे सोडून बेसन आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडं जाडसर मिश्रण करून घ्या. म्हणजे शेवग्याच्या शेंगला ते व्यवस्थित लागून राहते. शेंगा बेसनाच्या मिश्रणात घाला व घोळवून घ्या. कढईतील तेल कडकडीत तापल्यावर मग मध्यम आचेवर शेंग भजी तळून घ्या. सगळीकडून नीट लालसर होईपर्यंत तळून घ्या. म्हणजे शेवग्याच्या शेंगांची गरमागरम भजी तयार. ही भजी नुसतीच छान लागतात. सॉस किंवा चटणीसोबत ती खाऊ शकता

टीप-:

शेवगाच्या शेंगा कोवळ्या असाव्यात. शेवग्याच्या शेंगेला मध्ये चीर मारू शकता आणि लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची वापरूनही ही भजी करू शकता.

मागे

अंडा करी
अंडा करी

साहित्य -: अर्धा डझन उकडलेली अंडी, बारीक चिरलेले दोन मोठे कांदे व त्यास १:१ प्....

अधिक वाचा

पुढे  

हिवाळ्यात प्यावे असे हेल्दी सूप्स
हिवाळ्यात प्यावे असे हेल्दी सूप्स

मीरीयुक्त रस्सम् साहित्य -: १०० ग्रॅम टोमॅटो, ५० ग्रॅम चिंच, १ चमचा अख्खी क....

Read more