By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -:
अर्धा किलो मटण, 4-5 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, 1/2 कप दही, 2 लवंगा, 2 मोठी वेलची, 2 काड्या कलमी आणि 2 पानं तेजपान, 1 लहान चमचा जिरं, 1 लहान चमचा धने पूड, 1 लहान चमचा तिखट, 1 लहान चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, 2-3 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती -:
एका जाडसर भांड्यात तेल गरम करावे. त्यात खडा मसाला व कांदे घालावे. कांदे चांगल्याप्रकारे परतून घ्यावे नंतर त्यात धुऊन स्वच्छ केलेले मटण, मीठ, जिरं व धनेपूड घालावी. आता झाकण लावून 8-10 मिनिट शिजवावे. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमॅटो, तिखट आणि फेटलेले दही घालून चांगल्याप्रकारे एकजीव करून त्यात अडीच कप पाणी घालावे व झाकण लावून शिजत ठेवावे. जेव्हा मटण पूर्णपणे शिजून जाईल तेव्हा वरून गरम मसाला घालून पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करावे.
साहित्य -: 200 ग्रॅम भगर, 100 ग्रॅम राजगिरा पीठ, 100 ग्रॅम सिंगाड्याचे पीठ, चवीनुसार ....
अधिक वाचा