ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ज्वारीची भाकरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 04, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ज्वारीची भाकरी

शहर : मुंबई

ज्वारीची भाकरीसाठी लागणारी सामग्री :-

ज्वारीचा आटा कप

पाणीभिजवण्यासाठी आवश्यकतेनुसार

मीठस्वादानुसार

ज्वारीची भाकरी बनविण्याचा विधी:-

एका भांड्यात / कप पाणी घ्या पाण्याला गरम होऊ द्या पाणी जास्त गरम होऊ द्या. पाणी उकडले पाहिजे पाण्यात बुडबुडे दिसायला पाहिजेत. आता कोपरामध्ये ज्वारींचा आटा घ्या त्यात उकडल्या पाण्यापैकी अर्धे पाणी घाला. आट्याची चांगली कणिक करण्यासाठी मोठ्या चमच्याचा वापर करू शकता. आट्यात चिकटपणा येण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करतो. कन्नड भाषेत याला जीगातु असे म्हणतात.

आट्यात गरम पाणी टाकल्यावर त्याची चांगली मळून करून कणिक बनवा. थोड्या वेळेसाठी हि कणिक मोकळी ठेवून द्या. नंतर तयार कणकेचा गोळा घेवून त्याचा मोठ्या आकाराचा बॉल बनवा ज्याची आपण भाकर बनवू.

आट्याच्या गोळ्याला भाकरीच्या आकारासाठी गोळा हातात घेवून हळू हळू दाबून भाकरीचा आकार द्या भाकरीचा आकार बिघडला तर तो निट करा हातांचा वापर करता लाटनाच्या मदतीने पण भाकरीला आकार देता येतो. पारंपारिक पद्धतीने ज्वारीची भाकर हि फक्त हातानीच बनविली जाते.

आता चुलीवरील गरम तवा चांगला गरम झाला कि नाही हे थोडे पाण्याचे थेंब टाकून बघा. तवा गरम झाल्यावर भाकर त्यावर ठेवा. भाकर चांगली भाजू द्या त्यावर भाकरीच्या वरच्या बाजूस थोड पाणी शिंपडून पाणी सुखेपर्यंत वाट बघा. नंतर भाकर पलटून ठेवा. लक्ष्यात ठेवा कि भाकरीला भाजण्यात वेळ लागतो त्यामुळे भाकर चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूस भाजून घ्या.

तयार गरम भाकर तुम्ही सुक्या भाजी सोबतही खाऊ शकता परंतु भाकर हि पारंपारिकरित्या झुणका वांग्याचे भरीत आणि हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबातच खातात.

मागे

भरली वांगी
भरली वांगी

हि भाजी करण्यासाठी व ती लोकांना जास्त पसंत करण्यासाठी दोन प्रमुख गोष्टीचे ....

अधिक वाचा

पुढे  

Kolhapuri Bhadang
Kolhapuri Bhadang

साहित्य: चुरमुरे, शेंगदाणे ,लसुण, जिरे, लाल,तिखट, हळद, कढीलिंब, तेल ,मि....

Read more