ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खमंग डोसे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 03:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खमंग डोसे

शहर : मुंबई

लागणारे साहित्य -:

एक वाटी तांदळाचे पिठ , अर्धी वाटी रवा , पाऊणवाटी दही , चवीपुरते मिठ , तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , एक चमचा मोहरी , एक चमचा जीरे ,चवीनुसार दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने.

पाककृती -:

प्रथम एका पातेल्यात तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.

डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून ठेवावे.

गॅसवर एका मोठ्या कढल्यात तडका फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी व जिरे टाकून दोन्ही चांगले तड तडल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने घालून २-३ मिनिटे चांगले परतून घावे आणि ही तडका फोडणी ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.

आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.

 

पुढे  

मोड आलेल्या मेथी दाण्याची भाजी
मोड आलेल्या मेथी दाण्याची भाजी

साहित्य -: १. मोड आलेले मेथी दाणे = १ वाटी २. कीसमीस = पाव वाटी ३. एक कांदा, उभा ....

Read more