By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 20, 2019 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य:
एक कप हिरव्या मिरच्या चिरुन तुकडे (तुकडे साधारण बोटाच्या पेराच्या निम्मे
व्हिपिंग क्रीम अर्धा कप किंवा लागेल तशी.
१/२ चमचा हळद,
१ चमचा जिर्या धन्याची पावडर
हिंग
तेल
मीठ
पाककृती:
तेल ताप्वून त्यात हिंग घालावा.
जिरे घालुन तडतडले कि मिरच्या घालुन परतावे.
धण्या जिरेची पूड, आणि हळद घालून परतावे.
आता त्यात क्रीम ओतावी. (साय वापरत असाल तर थोडी चमच्याने बारीक करुन मग घालावी. परतत रहावे. आळत आले कि मीठ घालुन गॅस बंद करावा. झाकण लावू नये. (मिरच्या सॉगी होतात. त्या करकरीतच राह्यला पाहिजेत. )
वरून लिंबू पिळुन गरम चपात्यांबरोबर खावी.
अधिक टिपा:
लांबड्या, मध्यम तिखट मिरच्या घ्याव्यात.
साहित्य: १ किलो किंवा २-३ पाऊंड - मटण किंवा चिकन (हाडांसहित) २ मध्यम आका....
अधिक वाचा