ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रगडा पॅटिस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 07:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रगडा पॅटिस

शहर : मुंबई

साहित्य - :

वाटाणे, मीठ, हळद, तिखट, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, जिरे, बारीक शेव, हिरवी आंबटगोड चटणी.

कृती - :

सर्वप्रथम वाटाणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद आवडीप्रमाणे तोडे तिखट घालावे. ही उसळ मऊ शिजवून घ्यावी. यात मसाला किंवा घालत नाही. पॅटिससाठी उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, लसूण, आले जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत. नंतर तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्स करून शॅलो फ्राय करावेत. सर्व्ह करताना एका डिशमध्ये दोन पॅटिस घेऊन त्यावर रगडा घालावा. मग त्यावर शेव आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालाव्यात.

मागे

शेव भाजी
शेव भाजी

साहित्य -: १०० ग्रॅम भावनगरी शेव, दोन कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपाला, अर....

अधिक वाचा

पुढे  

दह्यातील मिरच्या
दह्यातील मिरच्या

साहित्य  -: 1 किलो लोणच्याच्या मोठ्या मिरच्या, आलं 1 लहान तुकडा, 750 ग्रॅम दही, 6 ....

Read more