ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रताळ्याचे गुलाबजाम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रताळ्याचे गुलाबजाम

शहर : मुंबई

सामुग्री -: चार रताळी, साखर दीड वाटी, तळण्यासाठी तूप, शिंगाडे पीठ 2 चमचे, साबुदाणा पीठ 1 चमचा, वेलची पूड

कृती -: रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे. कढईत तूप तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे.

मागे

चटपटीत भुट्टयाची भजी
चटपटीत भुट्टयाची भजी

साहित्य -: नरम भुट्टे 1 किलो, दिड कप बेसन, 1 शिमला मिरची, 1 कांदा ( बारीक चिरलेला), 1 ....

अधिक वाचा

पुढे  

आरतीचे मोदक
आरतीचे मोदक

साहित्य -: दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन टीस्पून पातळ तूप, तेल किंवा लोणी, अडी....

Read more