ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेव

शहर : मुंबई

साहित्य -: 2 वाटी तेल, 8 चमचे तिखट, 8 चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचा ओवापूड(ऐच्छिक), अंदाजे 8 वाटया डाळीचे पीठ, तळण्याकरता तेल.

कृती -: सर्वप्रथम 2 वाटी तेल, 2 वाटी पाणी घालून हाताने परातीत फेसावे किंवा एग बिटरने एकजीव करावे. पांढरट रंगाचे होईपर्यंत फेसावे. त्या तेलात 2 चमचा ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व सामावेल तेवढे डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट भिजवायचे नाही. भाज्यांच्या पिठापेक्षा घट्ट असावे. पसरट कढईत तेल तापवावे. वरील तयार पीठ सोर्‍यात मावेल एवढे भरावे. सोर्‍याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्‍या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा. थोडया वेळाने दूसर्‍या बाजूनी हलक्या हाताने उलगडून चवंगा दोन्ही बाजूनी हलक्या गुलाबी रंगावर तळावा व चाळणीत तेलातून निथळून काढावा. अशा रितीने सर्व पिठाचे चवंगे घालून शेव तळून घ्यावी.

 

 

मागे

करंजी
करंजी

साहित्य - : मैदा, मैदा भिजव‍िण्यासाठी दूध, तळण्यासाठ‍ी साजूक तूप आतले सारण....

अधिक वाचा

पुढे  

मिक्स धान्यांच्या चकल्या
मिक्स धान्यांच्या चकल्या

साहित्य -: हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल, तूरडाळ, धने, ती....

Read more