ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टोमॅटोची ग्रीन चटणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टोमॅटोची ग्रीन चटणी

शहर : मुंबई

साहित्य - : दोन कच्चे टोमॅटो, अर्धी वाटी किसलेले खोबरे, फोडणीसाठी तेल, हिंग, हळद, तीळ तीन चमचे, चार हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ.

कृती - : दोन कच्चे टोमॅटो घेऊन त्याच्या फोडी करा. साधारण दीड डाव तेल घ्या. त्यात मोहरी, हिंग थोडी हळद घालून फोडणी करा. त्यात तीन चमचे तीळ, अर्धी वाटी किसलेले खोबरे चार हिरव्या मिरचिचेतुकडे करून घाला. थोडे परतून टोमॅटोच्या फोडी घाला आणि परतून अर्धकच्चे शिजवा. चवीनुसार मीठ घाला. यामुळे टोमॅटोचा कच्चटपणा, तुरटपणा जातो. नंतर हे मिश्रण थंड करून मिक्सरमधून चटणी वाटून घ्या. आवडीनुसार ही चटणी मऊसूत किंवा थोडी जाडसर कशीही ठेवता येते. ती पोळी, भाकरी, पावाबरोबर चांगली लागते.

मागे

स्टीम्ड चिकन
स्टीम्ड चिकन

साहित्य -: 1 देशी चिकन, चवीनुसार मीठ. सॉससाठी साहित्य -: एक लहान चमचा लसणाची पे....

अधिक वाचा

पुढे  

फणस भाजी
फणस भाजी

साहित्य -: फणस असमासे अर्धा किलो, ४ मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, धणे पूड, क....

Read more