ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उपवासाचा डोसा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2019 07:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उपवासाचा डोसा

शहर : मुंबई

साहित्य -: तीन लहान वाट्या वरई, एक लहान वाटी साबुदाणा, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ.,

चटणीसाठी -: एक वाटी खोवलेले ओले खोबरे, एक मिरची,       

चवीनुसार साखर, लिंबू, मीठ.

 

भाजीसाठी -: तीन बटाटे उकडून, चमचाभर शेंगदाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून, तेल, जिरे.

 

कृती -: रात्री वरीचे तांदूळ आणि साबुदाणा नीट धुऊन वेगवेगळे भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेऊन एकत्र करावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालून तीन तास झाकून ठेवावे. डोसे करतेवेळी नॉनस्टिक तव्यावर वाटीने डोसे घालावेत.

खोवलेले खोबरे, हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करावे. त्यात चवीनुसार साखर, मीठ लिंबू घालून चटणी तयार करावी. भाजी करताना बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. भांड्यात तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या घालून त्यात बटाटे शेंगदाण्याचे कुट घालून भाजी तयार करावी. बटर, हिरवी चटणी आणि बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व्ह करावेत.

मागे

उपवासाची कचोरी
उपवासाची कचोरी

साहित्य -: पावभर रताळी, दोन बटाटे, 1 वाटी खवलेले खोबरे, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धी....

अधिक वाचा

पुढे  

चटपटीत भुट्टयाची भजी
चटपटीत भुट्टयाची भजी

साहित्य -: नरम भुट्टे 1 किलो, दिड कप बेसन, 1 शिमला मिरची, 1 कांदा ( बारीक चिरलेला), 1 ....

Read more