By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 03:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -:
१. मोड आलेले मेथी दाणे = १ वाटी
२. कीसमीस = पाव वाटी
३. एक कांदा, उभा चिरलेला
४. लसुण ५,६ पाकळ्या, बारिक चिरलेल्या
५. तेल २ ते ३ चमचे
६. बारिक चिरलेली कोथोंबीर
६. मोहरी,तिखट, हळद, मिठ अंदाजे
पाककृती -:
कढईत दोन चमचे तेल तापवुन ,मोहरी घाला, मोहरी तडतडली की कांदा आणि लसुण घाला.. गुलाबीसर परतुन घ्या.. मग किसमीस घालुन पाच सात मिनटे पुन्हा परतायचे.. हळद, तिखट घालायचे, मग मेथ्या घालुन पुन्हा परतायचे.. मिठ घालुन एक वाफ काढुन घ्या..
बारिक कोथींबीर घालुन सर्व्ह करा.
हिवाळ्यात मेथी खाल्ली की कंबर दुखणे, हात पाय दुखणे अशा तक्रारी येत नाहीत. म्हणुन ही भाजी / उसळ आठवड्यातुन एकदा तरी खा
पौष्टीक आणि जरा वेगळ्या चवीची आहे त्यामुळे एकदा करुन पहा.