By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन आवश्यक आहे, यामुळे साथीदार अधिक परिश्रम करतात
भांडखोर आणि असभ्य लोकांच्या तुलनेत शांत, विश्वासू आणि चांगली वागणूक असणारे लवकर यशस्वी होतात
प्रोफेशनल जगतात पाऊल ठेवल्यानंतर सर्वांनाच वाटते की, आपण एक दिवस मोठ्या पदावर पोहोचू किंवा मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू, मात्र तुम्हाला माहिती आहे का? की असे तेव्हाच शक्य होते, जेव्हा तुम्ही, उदार, शांत आणि विश्वासू राहाल. नुकतेच कार्यालयातील व्यवहराराविषयी झालेल्या संशोधनात सांगण्यात आले आहे.
संधोधनानुसार, कार्यालयात, कपटी किंवा आक्रमक लोक मोठ्या पदावर जाण्याची शक्यता कमी असते, तर लोकांच्या जास्त संपर्कात राहणारे किंवा लोकांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना ऑफिसमध्ये जास्त फायदा मिळतो.
अमेरिकेतील साइंटिफिक जर्नल प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेजमध्ये प्रकाशित संशोधनात संधोधक प्रोफेसर कॅमरन एंडरसरन, सायकोलॉजी प्रोफेसर ऑलिवर पी जॉनसन, डॉक्ट्रेट विद्यार्थी डॅरन एल शार्प्स आणि एसोसिएट प्रोफेसर क्रिस्टोफर जे सोटो यांनी कॉलेजच्या अशा विद्यार्थ्यांना 14 वर्षांनंतर ट्रॅक केले, जे भांडखोर किंवा वाईट व्यवहार असणारे होते.त्यांनी या विद्यार्थ्यांवर दोन संशोधन केले. निष्कर्श निघाला की, मतलबी, धोकेबाज आणि आक्रमक लोकांना मोठे पद मिळण्याची शक्यता खूप कमी होती. संशोधकांनी संशोधनात सामिल विद्यार्थ्यांना त्यांचे पद, पॉवर आणि कंपन्यांच्या वातावरणाविषयी प्रश्न केले होते.
वाईट व्यवहार असलेले यशस्वी होत नाही असे नाही
संशोधक कॅमरन एंडरसन म्हणाले - 'मी संशोधनातून समोर आलेल्या गोष्टींमुळे आश्चर्यचकीत आहे. तुम्ही कोण आहात या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. वाईट व्यवहार तुम्हाला कोणत्याही कॉम्पिटीशनमध्ये फायदा देत नाही.' ते म्हणाले की, असे नाही की, वाईट अॅटीट्यूड असणारे लोक यशस्वी होत नाही, मात्र दुसऱ्या लोकांच्या तुलनेत त्यांना यश मिळवण्यात वेळ लागतो आणि वाईट अॅटीट्यूड कोणत्याच परिस्थिती त्यांची मदत करू शकत नाही.
एंडरसन म्हणाले, 'वाईट वृत्त म्हणजे संस्था तरीही शांत लोकांप्रमाणेच वाईट अॅटीट्यूड असणाऱ्या लोकांनाही मोठ्या जबाबदाऱ्या देतात. दूसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर त्या वाईट लोकांना दुसऱ्यांच्या बरोबरीत शक्तीशाली बनण्याची संधी देतात. खराब व्यवहार असणारे लोक त्यांच्या संस्थेला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात हे माहिती असूनही असे केले जाते.'
दोन्ही संशोधनांनुसार जाणून घेऊया
पहिल्या स्टडीमध्ये संशोधकांनी 457 लोकांना सामिल केले आणि त्यांना ऑफिसमध्ये ताकद आणि वाईट व्यवहारामध्ये काहीच संबंध आढळला नाही. तर दूसऱ्या संशोधनात संशोधकांनी सामर्थ्य वाढवण्याच्या चार मुख्य पद्धती तपासल्या.
या पद्धतींमध्ये आक्रमक वर्तन किंवा धमकावणे आणि गुंडगिरीचा वापर करणे, राजकीय वर्तणूक किंवा प्रभावशाली लोकांबरोबर काम करणे, जातीय वर्तन किंवा इतरांना मदत करणे, स्पर्धात्मक स्वभाव किंवा कामात चांगले असणे यांचा समावेश होता.त्यांनी संशोधनात सामिल लोकांच्या सहकाऱ्यांनाही रेटिंग करण्यास सांगितले. यानंतर संशोधकांना कळले की, वाईट व्यवहार करणारे लोक का दूसऱ्यांच्या तुलनेत लवकर यश मिळवू शकत नाही.
5 टिप्स ज्या कामाचे सामर्थ्य वाढवण्यात मदत करु शकतात
वर्कप्लेसवर चांगले वातावरण निर्माण करणे खूप आवश्यक आहे. यामुळे कार्यालयात मजबूत रिलेशन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यात मदत मिळते. उदारतेने प्रोडक्टिव्हिटी, मोटिव्हेशन आणि चांगले वातावरण निर्माण होते.
आपला वेळ द्या आपल्या टीमच्या सदस्यांसाठी नेहमी हजर राहायला हवे. यावरुन कळते की, ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. सहकाऱ्यांसोबत बातचिक करताना किंवा जेव्हा त्यांना गरज असेल त्यांच्यासाठी अवश्य वेळ काढा.
बोलणे ऐका सहकाऱ्यांचे बोलणे ऐकून घेणे खूप आवश्यक आहे. अनेक लोक समजून घेण्याऐवजी प्रतिक्रिया देण्यासाठी गोष्टी ऐकतात. या व्यतिरिक्त आपसात न बोलणे किंवा टीमसोबत चर्चा करण्यासाठी नकार देणे यामुळे गैरसमज वाढतात.
संधी द्या जर तुम्ही अशा पदावर आहात जेथे तुम्ही दुसऱ्यांना संधी देऊ शकता, तर त्यांना पुढे आणणे तुमची जबाबदारी आहे. लोक अशा कंपनीमध्ये काम करु इच्छित नाही, जिथे त्यांना पुढे जाण्याची आणि चांगले काम करण्याची संधी मिळत नसेल. यामुळे कंपनी असणाऱ्या सहकाऱ्यांना नवीन काम करण्याची संधी द्यायला हवी.
प्रोत्साहन द्या अनेक वेळा कामाचा दबाव खूप जास्त असतो आणि गोष्टी अपेक्षेप्रमाणे पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी अनेक वेळा टीमचा आत्मविश्वास कमी होतो. अशा वेळी त्यांना गरज असेल तर प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. एका संशोधनानुसार, 79% कर्मचाऱ्यांनी म्हटले की, प्रोत्साहन मिळाल्याने त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे.
नवीन गोष्टी शिका ऑफिसमध्ये अनेक वेळा टीम मेंबर्स एकच काम करुन बोर होतात. ही समस्या दूर करण्याची पद्धत म्हणजे सहकाऱ्यांना नवीन स्किल शिकण्याची किंवा शिकवण्याची संधी द्या. नवीन स्किलसंबंधीत प्रश्न आणि उत्तरांसाठी तयार राहा.
खरं तर फॅशनचं जग ग्लॅमरस आहे. त्यातून एखाद्याला प्रसिद्धी मिळाली की ती फॅशन ....
अधिक वाचा