ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अक्षय्य तृतीयाला सोन्याच्या दरात घसरण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 07:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अक्षय्य तृतीयाला सोन्याच्या दरात घसरण

शहर : मुंबई

अक्षय्य तृतीया काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सणाच्या काही दिवस आधी सोनं स्वस्त झाल्यामुळे अनेकजण खेरदीची तयारी करत आहे. गेल्या महिन्यापासून सोनं 5.76 टक्के स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करायची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने तसेच सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असल्याने हा परिणाम झाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने अनेक ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेसाठी ऑर्डर देण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी सात मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करता यावं यासाठी ग्राहक आतापासून ऑर्डर देत आहेत.
भारत सरकार प्रत्येक 15 दिवसानंतर सोन्याचे भाव ठरवते. लग्नसराईमध्ये वर्षाच्या सुरूवातीला सोन्याचा भाव 35 हजारांवर गेला होता. मात्र, फेब्रुवारीच्या अखेरीस 34 हजार रुपये प्रति तोळा झाला. तर मार्च-एप्रिलमध्ये सोन्याची किंमत आणखी कमी झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोनं 33 हजारांवर आलं. 9 मार्च रोजी 32 हजार 800 रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा भाव आणखी कमी होऊन 32 हजार 300 रूपये प्रतितोळा झाला. मे महिन्याच्या सुरूवातीला सोनं दोन टक्क्यानं स्वस्त होऊन प्रतितोळा 31 हजार 500 रूपये झाले. आता सोनं आणखी एक टक्क्याने स्वस्त होण्याची शक्यता आहे. जून पर्यंत सोन्याची किंमत आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागे

शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या मुलीला पहा कशाची आवड
शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या मुलीला पहा कशाची आवड

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुलगी अन्वी तावडेचा फॅशन सेन्स सध्या सगळीक....

अधिक वाचा

पुढे  

ऑफिसचा पहिला दिवस!
ऑफिसचा पहिला दिवस!

ऑफिस जॉइन करायचा पहिला दिवस असेल तर उत्सुकता आणि भीतीसुद्धा मनात असते. सहका....

Read more