By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 05:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पाटल्या, शिंदेशाही तोडे, चपलाहार अशी नुसती नावं जरी ऐकली तरी पुलाच्या अलीकडचं पुणंच आठवतं नाही का! फक्त पेठा असलेलं, हौसेपेक्षा पैशाचं मोल वसूल करणारं, वर्षानुवर्ष टिकतील असे दागिने करण्याकडे कल असलेलं पुणं डोळ्यासमोर उभं रहातं. आधी लग्नात अनारकली हार, पेट्या, मोत्यांचा तन्मणी हे दागिने असायचेच. मंगळसूत्रसुद्धा पारंपरिक असायचं.
पुलापलीकडचं पुणं आधीच जरा मॉडर्न’ झालेलं होतं. अलीकडच्या पुण्याला पुलापलीकडच्या पुण्याचं आकर्षण होतंच. या पेठांच्या पुण्यामध्ये बदल होऊ लागला. दोन पदरी ऐवजी एक पदरी मंगळसूत्र चालू लागलं.जडावाचं मंगळसूत्रही स्त्रियांनी स्वीकारलं. दागिन्यांची तीच ती डिझाइन थोडीशी बोजड म्हटली तरी चालातील पण ती हळूहळू आवडेनाशी झाली. त्यातच सोन्याचे वाढणारे भाव, न परवडणारे घसघशीत डाग यातून सुवर्णमध्य म्हणून एक ग्रॅमचे सोन्याचे दागिने आले. स्त्रियांची दागिन्यांची हौस तशीच राहिली आणि त्यांनी हे दागिनेही पसंत केले. कारण शहरातली वाढती महागाई, वाढते खर्च यामुळे सोन्यात पैसे गुंतवणं अशक्य होऊ लागलं. इतर राज्यातले दागिने आले आणि लोकप्रिय झाले.
लग्नात मुलीच्या अंगावर सोनं किती घालायचं याच्या मर्यादा ठरू लागल्या. मुलीसुद्धा नोकरी लागल्यावर पैसे साठवू लागल्या किंवा सोन्यात गुंतवू लागल्या तशी गरजच निर्माण झाली. हिर्याचे दागिने खरं तर स्वप्नच होतं पण अमेरिकन डायमंडमुळे ते स्वप्न काहीसं प्रत्यक्षात उतरलं, त्याच्या कुड्या, बांगड्या, मंगळसूत्रातली पदकं असे विविध प्रकार आले. खरं तर मंगळसूत्र बदलणं ही कल्पनाही पुणेरी संस्कृतीत न बसणारी. पण मॅचिंग मंगळसूत्राची फॅशन आली आणि जडावाच्या, कोल्हापुरी मंगळसूत्रांनी प्रथम पसंती मिळवली. ओवलेली मंगळसूत्र कमीपणाची वाटायची पण तीही आवडू लागली. त्यातही वाट्यांऐवजी वेगवेगळ्या पदकांनी बाजी मारली. कमी वजनाच्या दागिन्यात 90-92 साली ठुशी आली आणि आजही ती स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारांसह ठाम उभी आहे.
पूर्वी ही खरेदी करण्यासाठी सोन्या-चांदीच्या वस्तू घेण्यासाठी आधी जिन्नस बघणं, त्यावर सगळ्यांचं मत घेणं, पैशाची जमवाजमव करणं, दर महिन्याला पैसे बाजूला काढून ठेवणं, हे करावं लागायचं. इन्स्टंटच्या जमान्यात मात्र पैशाची जोखीम जवळ बाळगण्याचं काम हे काम क्रेडिट कार्डनी सोप्प करून टाकलं.
आयुष्य धकाधकीचं झालं, ताण-तणाव वाढले तसे विविध ग्रहांचे खडे वापरण्याची लोकांना गरज भासू लागली. त्यात पुष्कराज, नीलम, नवग्रहाचे बारीक खडे, मोती यांची बाजारपेठ भरपूर वाढली. खरे हिरे परवडतील इतक्या कॅरटचे वापरले जाऊ लागले. नवग्रहांच्या खड्यांना खूप मागणी वाढली. शहराचा पसारा वाढला, राहण्याची ठिकाणं लांब लांब गेली, वाहनांची गर्दी या सार्या तुलनेत सोन्याची दुकानं मात्र अगदी भरपूर प्रमाणात बाहेरच्या भागात झाली नाहीत आणि त्यामुळे अशा खरेदीला फार वेळही देणं लोकांना परवडेनासं झालं. सगळं झटपट तशीच ही खरेदीही झटपट होऊ लागली. प्रसिद्ध सराफी दुकानांच्या शाखा निघाल्या तरी मूळ दुकानावर विश्वास ठेवला जाऊ लागला. अलीकडे इतर गुंतवणुकीवरचा लोकांचा विश्वास उडत चालल्याने सोनं, हिरे यांतील गुंतवणूक लोकांना विश्वासार्ह वाटू लागली, हे नक्की!
सोन्याच्या तुलनेत आर्टिफिशियल ज्वेलरी कमी भावात मिळते. हल्ली सोन्याचा भाव ....
अधिक वाचा