By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 03:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुलगी अन्वी तावडेचा फॅशन सेन्स सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. रंगवलेले केस असो किंवा टोचलेले नाक, अन्वीचं अनोखं फॅशन सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोंमध्येही पाहायला मिळत आहे.
अन्वी पुण्यातील ‘सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्स’मध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या फेसबुक अकाऊंटवरही बरेच फोटो पाहायला मिळत आहेत. हे फोटो पाहून अन्वीला हेअर कलर करणं फार पसंत असल्याचं समजतंय. कारण विविध प्रकारे तिने केस रंगवल्याचे अनेक फोटो तिच्या फेसबुक अकाऊंटवर आहेत. इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा आपलीच स्वतंत्र शैली निर्माण करून काही वेगळे करण्याच्या अन्वीच्या या फॅशनमध्ये नाकातली चमकी व नथनीसुद्धा पाहायला मिळत आहे.