ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जामिया हिंसाचार प्रकरणी १० जणांना अटक

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जामिया हिंसाचार प्रकरणी १० जणांना अटक

शहर : delhi

        नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत जामियानगर परिसरात झालेला हिंसाचार आणि तोडफोड-जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली. महत्वाची गोष्ट म्हणजे अटक करण्यात आलेले हे दहाही जन गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यात एकही विद्यार्थी नाही यातील तिघेजण या परिसरातील बीसी म्हणजेच बॅंड कॅरेक्टर घोषित गुन्हेगार आहेत. दक्षिण दिल्लीच्या न्यू  फ्रेण्डस कॉलनीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
       न्यू फ्रेण्डस कॉलनीमध्ये काही समाजकंटकांनी उच्छाद मांडला, या आंदोलनात ३ बसेससह अन्य वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली. इतकेच काही तर आग विजविण्यासाठी आलेल्या आग्निशमक दलाच्या ४ पैकी एक गाडी पूर्णपणे नष्ट केली. त्याच बरोबर इतर वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात १० पोलिसांसह आग्निशमक दलाचे २ कर्मचारीही जखमी झाले. 
          या आंदोलनात जामियाचे बनावट ओळखपत्र बनवून समाजकंटक सामील झाल्याने हिंसा वाढली, असा पोलिसांचा संशय आहे. उच्छाद घालणार्या पर्यंत पोहोचण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही आणि हिंसाचाराचे व्हायरल फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारावरच १० स्थानिक गुन्हेगारांना पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मागे

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीपाठोपाठ मुंबईतही निदर्शने
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीपाठोपाठ मुंबईतही निदर्शने

           मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पूर्वोत्तर राज्य, ....

अधिक वाचा