By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 07:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - आज विधानसभेत झालेली विशेष बैठक पार पडली असून या बैठकीत केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकरनेही अनुसूचीत जाती आणि जमाती राजकीय आरक्षणाला १० वर्षाची मुदतवाढ करून दिली असून विधानसभेच्या आज झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने एससी आणि एसटीसाठी लोकसभा व विधानसभा राखीव जागा ठेवण्यासाठी मंजूरी देण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एससी आणि एसटीच्या आरक्षणाला १० वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी हा ठराव मांडला असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासह समाजालाहि न्याय मिळवून दिले आहे. आज हि भारतात जाती जमातीच्या नावाने परिस्थितीचा सामना करावा लागतो. लोकांचे हक्क त्यांना मिळवून देणे महत्वाचे आहे.
दरम्यान, विधानसभेचे माजी सदस्य चुन्नीलालभाऊ गोपालभाऊ ठाकूर आणि अमृतराव वामनराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला.
नागपूर - महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भा....
अधिक वाचा