By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 27, 2020 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) हात असल्याची माहिती ईडीच्या अहवालातून समोर आली आहे. ७३ बँकांमध्ये १२० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली होती, असा दावा अहवालात केला आहे.
संसदेत नागरिकत्व दुरूस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागांतील बिजनौर, हापुड, बहराइच, शामली आणि डासना परिसरातील ७३ बँक खात्यांमध्ये जवळपास १२० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. तसेच या पैशांचा वापर कायद्याविरोधातील आंदोलनांसाठी करण्यात आला होता, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काश्मीर विभागालाही १.६५ कोटी रुपये मिळाले. ईडीने या आर्थिक व्यवहाराबाबत गृह मंत्रालयाला कळवले होते. हा अहवाल उत्तर प्रदेशातील हिंसक घटनांमध्ये अटक केलेल्या पीएफआयचा अध्यक्ष वसीम अहमदला गेल्या आठवड्यात जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांनी जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश पोलीस वसीमविरोधात पुरावे गोळा करण्यात अपयशी ठरले होते.
मुंबई : राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसा....
अधिक वाचा