ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 04:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असताना आता विविध राज्यांचे प्रभारीदेखील राजीनामे देऊ लागले आहेत. आसामपासून पंजाबपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून राजस्थानपर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत पक्षाच्या 13 वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे राजीनामे राहुल गांधींकडे पाठवले आहेत. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. मात्र काँग्रेसनं त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. आपली जागा घेऊ शकेल अशी व्यक्ती शोधा, अशा सूचना राहुल यांनी पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसमधील 13 बड्या नेत्यांनी राहुल यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणूक निकाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला.

अशोक चव्हाण यांच्यानंतर पंजाब काँग्रसचे अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार आणि आसाम काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरांनी सोमवारी त्यांचे राजीनामे राहुल यांना पाठवले. जाखड यांनी गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपाचे सनी देओल यांच्याकडून पराभूत झाले. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. याशिवाय काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीदेखील राजीनामे दिले आहेत.

मागे

सुप्रिया सुळे लागल्या कामाला : विधानसभेसाठी बोलावली बैठक
सुप्रिया सुळे लागल्या कामाला : विधानसभेसाठी बोलावली बैठक

खासदार झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही तय....

अधिक वाचा

पुढे  

प्रचारकाळात सकाळी 6 वाजताच अमित शहांचा फोन यायचा : योगी आदित्यनाथ
प्रचारकाळात सकाळी 6 वाजताच अमित शहांचा फोन यायचा : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि महाआघाडीला पराभूत केल्यानंतर पंत....

Read more