ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

193 वस्तूंवरील कर दरात घट - सुधीर मुनगंटीवार

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

193 वस्तूंवरील कर दरात घट - सुधीर मुनगंटीवार

शहर : मुंबई

वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये 228 पैकी 193 वस्तुंवरील कर 28 टक्क्यांहून 18 टक्के इतके कमी करण्यात आले. 18 टक्क्यांच्या व 12 टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर दर आणखी कमी करण्यात आले तर काही वस्तूंवर  करमाफी देण्यात  आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

ज्या वस्तूंचा कर दर 28 टक्क्यांहून 18 टक्के इतका कमी करण्यात आला त्यात प्रामुख्याने प्लायवूडवीनीयर पॅनल्सतत्सम लॅमिनेटेड लाकूडस्टोव्ह( केरोसीन व एलपीजी स्टोव्ह वगळता),हातातील घड्याळे,पॉकेट व इतर घड्याळेस्टॉप वॉचेसफ्रीझफ्रीझरवॉटर कुलरदुधाच्या कुलरसह रेफ्रिजरेटिंग किंवा अतिशीत उपकरणेवॉशिंग मशिनव्हॅक्युम क्लिनर68 सें.मी पर्यंतचे दुरदर्शन संच32 इंचापर्यंत स्क्रीन असलेले मॉनीटरयासारख्या वस्तूंचा समावेश आहे.

पॅकेज केलेले पेयजलकंडेन्सड मिल्कशेतीच्या मशागतीसाठीवनीकरणासाठी किंवा लागवडीसाठी लागणारे यंत्राचे भागतसेच लॉन किंवा स्पोर्टस ग्रांऊड रोलर्समुख्य कंत्राटदाराला उप कंत्राटदाराद्वारे प्रदान केलेल्या वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस यांचा कर दर 18 टक्क्यांहून 12 टक्के करण्यात आला.

18 आणि 12 टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधे असलेल्या संगणक सॉफ्टवेअरकॉम्पॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी (सीडी रॉम),रेकॉर्ड केलेले मॅग्नेटिक टेपमायक्रोफिल्मसमायक्रोफिचेसघरगुती वापरामध्ये येणारे एलपीजी1000 रुपये प्रति जोडी पर्यंत किंमत असणारे पादत्राणेयासारख्या वस्तूंचे कर दर कमी होऊन ते 5 टक्के इतके झाले. इलेक्ट्रिक वाहनांवरील कर दर 12 टक्क्यांहून 5 टक्के इतका कमी करण्यात आला. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जरकिंवा चार्जिंग स्टेशन यावरील कर दर 18 टक्क्यांहून 5 टक्के इतका कमी करण्यात आला. भारत सरकारने पुरस्कृत केलेल्या धार्मिक यात्रेकरुंसाठी विमान प्रवासावरील कर दर 5 टक्के (इनपुट सर्व्हिसेसवरील आय टी सी सह)  करण्यात आला.

 कोणत्याही भाषेतील नाट्य क्षेत्रातील संगीतनृत्यनाटकऑर्केस्ट्रालोक किंवा शास्त्रीय कला यासारख्या सर्व नाट्य सादरीकरणाच्या प्रवेशासाठीच्या तिकिटांच्या किंमतीवरील जीएसटी दराची सूट मिळण्याची मर्यादा 250 रुपयांहून 500 रुपये इतकी वाढवण्यात आली.

100 रुपयांपर्यंत किंमत असलेल्या सिनेमा तिकिटावरील कराचा दर 18 टक्क्यांहून 12 टक्के आणि 100 पेक्षा जास्त किंमत असलेल्या सिनेमा तिकिटाचा कर दर 28 टक्क्यांहून 18 टक्के इतका कमी करण्यात आला.  महिलांची आरोग्य विषयक सुरक्षितता आणि स्वच्छता लक्षात घेऊन सॅनेटरी नॅपकिन्स करमुक्त करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर दर कपातीमुळे कर अनुपालनात वाढ होऊन त्याचा परिणाम महसूल वृद्धीत होईल असा विश्वास वित्तमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला असून कर दर कपातीमुळे सर्व सामान्य माणसाला आणि व्यापार-उद्योग जगताला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

 

मागे

धनगर समाजाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल डॉ. संजय कुटे यांचा सत्कार
धनगर समाजाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल डॉ. संजय कुटे यांचा सत्कार

धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल....

अधिक वाचा

पुढे  

न्यू जर्सीचे राज्यपाल फिलीप डी. मर्फी पंतप्रधानांच्या भेटीला
न्यू जर्सीचे राज्यपाल फिलीप डी. मर्फी पंतप्रधानांच्या भेटीला

अमेरिकेतल्या न्यू जर्सीचे राज्यपाल फिलीप डी. मर्फी यांनी आज सकाळी पंतप्रधा....

Read more