ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना धक्का, टीएमसीचे २ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना धक्का, टीएमसीचे २ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

शहर : calcutta

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने यंदा चांगलं यश मिळवलं आहे. यानंतर मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह हे आज भाजपचं कमळ हातात घेणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी वाजता भाजपच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे.लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपने यंदा १८ जागा जिंकल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील भाजपला फक्त जागा येथे मिळाल्या होत्या. मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढली. रॉय हे टीएमसीचे वरिष्ठ नेते होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी संपूर्ण रणनीती आखली. त्यांच्या नेतृत्वात भाजपने हा विजय मिळवला. टीएमसीला पर्याय म्हणून लोकांनी भाजपला निवडलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्ता मिळवणं नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहे.

 

मागे

राहुल गांधींचा राजीनामा 'आत्मघातकी' - लालू प्रसाद यादव
राहुल गांधींचा राजीनामा 'आत्मघातकी' - लालू प्रसाद यादव

लोकसभा निडवणूक २०१९ मध्ये स्वीकारव्या लागलेल्या दणदणीत पराभवानंतर काँग्र....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक
लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

लोकसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांना दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वच ठिकाण....

Read more