ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपाच्या नगरसेवकांना मोठा झटका , तीन नगरसेवकांचा जातीचा दाखला अवैध

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 03:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपाच्या नगरसेवकांना मोठा झटका , तीन नगरसेवकांचा जातीचा दाखला अवैध

शहर : मुंबई

भाजपाच्या नगरसेवकांना मोठा झटका बसला आहे. केशरबेन पटेल, मुरजी पटेल, राजपती यादव या 3 नगरसेवकांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला. भाजपाच्या चार आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा अर्ज अवैध ठरला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि राजपती यादव यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. जात पडताळणी समितीने भाजपच्या चार आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. 

पालिका निवडणुकीत निवडून आल्यावर एका वर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र हे प्रमाणपत्र सादर न झाल्याने ही कारवाई करण्यात आली होती. याविरोधात उच्च न्यायालयात या चारही नगरसेवकांनी धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने या चारही नगरसेवकांच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे या नगरसेवकांचं पद धोक्यात आले आहे.

 

 या नगरसेवकांचे पद रद्द झाल्यावर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना नगरसेवकपद मिळणार आहे. या तिघांचं पद रद्द झाल्यास एक जागा काँग्रेस आणि दोन जागा शिवसेनेच्या वाढणार आहेत. या सर्वात पालिकेत भाजपाला मोठा झटका लागला आहे. एकूण ५ नगरसेवक जात पडताळणीमुळे वादात होते. त्यापैकी ३ नगरसेवकांच्या याचिका फेटाळल्या. केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि राजपती यादव याच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. केसरबेन पटेल आणि मुरजी पटेल हे दाम्पत्य भाजपाचे नगरसेवक आणि राजपती यादव या काँग्रेसच्या नगरसेवकालाही याचा फटका बसला.

 

सेनेला फायदा 

 

हायकोर्टाच्या निर्णयामुळे भाजपचे दोन नगरसेवक कमी होवून शिवसेनेचे दोन नगरसेवक वाढणार आहेत. काँग्रेसचा एक कमी होवून एक वाढणार आहे.

केशरबेन मुरजी पटेल यांच्याऐवजी दुसऱ्या क्रमांकावर असलेले नितिन बंडोपंत सलाग्रे, काँग्रेस तर मुरजी कानजी पटेल यांच्याऐवजी संदीप नाईक, शिवसेना यांचा नंबर लागणार आहे. केशरबेन व मुरजी हे पती पत्नी आहेत तर राजपती बरगून यादव, काँग्रेस ऐवजी शंकर हूंडारे, शिवसेना यांचा नंबर लागेल.

मागे

'हेडलाईन'साठी मोदींकडून पवार कुटुंबावर टीका; सुप्रिया सुळेचं प्रत्युत्तर
'हेडलाईन'साठी मोदींकडून पवार कुटुंबावर टीका; सुप्रिया सुळेचं प्रत्युत्तर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे त्यांच्या भ....

अधिक वाचा

पुढे  

बहुजन महापार्टी महाराष्ट्रात स्वतंत्र लढणार
बहुजन महापार्टी महाराष्ट्रात स्वतंत्र लढणार

बहुजन महापार्टी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिट्टी या चिन्ह....

Read more