ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे पाच हजार चारशे मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. यामुळे दिव्यांगज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी सहभाग घेणे सुलभ होईल.

मुंबईमुंबई उपनगरेठाणेनाशिकपुणे यासारख्या महानगरांमध्ये जागेच्या मर्यादेमुळे लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावेम्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले असून जेथे लिफ्टची सुविधा आहे अशाच ठिकाणची मतदान केंद्रे पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणूक दरम्यान राज्यात 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. त्यात 5 हजार 325 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत 96 हजार 454 मतदान केंद्र आहेत. तेथे रॅम्पव्हिल चेअरपिण्याचे पाणी या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. यावर्षीच्या मतदार यादीमध्ये आतापर्यंत 3 लाख 60 हजार 885 दिव्यांग मतदार समाविष्ट आहेत. त्यांच्या सुलभतेसाठी मतदान केंद्रांवर रॅम्पव्हिलचेअर यांची सुविधा करण्यात येईल.

मागे

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रातल्या 45-सातारा या लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक घेण्याचा का....

अधिक वाचा

पुढे  

चला मतदान करुया ! माधुरी दीक्षितसह सदिच्छादुतांचे आवाहन
चला मतदान करुया ! माधुरी दीक्षितसह सदिच्छादुतांचे आवाहन

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्याव....

Read more