ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ७ महत्त्वाचे निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2020 05:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ७ महत्त्वाचे निर्णय

शहर : मुंबई

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत.

. राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.

. राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.

. वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

. टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.

. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महानगरपालिका नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.

. नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना. . कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.

 

मागे

उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला
उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला

कल्याण शीळ रोडवरील रस्त्यावरचे खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन कर....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा
राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला ....

Read more