ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

८.५८ लाख कन्हैया कुमारने भाषणातून कमावले

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

८.५८ लाख कन्हैया कुमारने भाषणातून कमावले

शहर : patna

विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (भाकप) उमेदवार म्हणून लोकसभेचा अर्ज भरला आहे. या निवडणूक अर्जात कन्हैया कुमारने स्वत:ला बेरोजगार दाखवले असून भाषण आणि पुस्तक विक्रीतून त्याने ८.५८ लाख रुपये कमावले असल्याचं नमूद केलं आहे. 

कन्हैया कुमारने बेगुसराई लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज भरताना त्यावेळी त्याच्या सोबत अभिनेत्री स्वरा भास्कर, मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, जेएनयूच्या माजी विद्यार्थी नेत्या शेहला राशिद आदी उपस्थित होते. याप्रसंगी 'लेके रहेंगे आझादी' अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. कन्हैया कुमार भाजपचे उमदेवार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवत आहे. कन्हैया कुमारने २०१८-१९मध्ये त्याची एकूण संपत्ती २ लाख २८ हजार २९० रुपये असल्याचं दाखवलं आहे. २०१७-१८मध्ये त्याची संपत्ती ६ लाख ३० हजार ३६० रुपये होती. नामांकन अर्जात गेल्या पाच वर्षाची आर्थिक माहिती कन्हैया कुमारकडे मागण्यात आली असता. त्याने मात्र केवळ दोन वर्षाचाच आर्थिक लेखाजोखा दिला आहे. 
कन्हैया कुमारच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्याकडे एकूण २४ हजार रुपये रोख रक्कम आहे. तर तसेच त्याच्या एका खात्यात १ लाख ६३ हजार ६४७ रुपये जमा असून तर त्याच्या दुसऱ्या खात्यात ५० रुपये जमा आहेत. भाषण आणि पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारी रॉयल्टी ही उत्पन्नाचं साधन असल्याचं त्यानं म्हटलं आहे. व्यवसायाच्या रकान्यात 'बेरोजगार आणि लेखन' असा उल्लेख त्याने केला आहे. शिवाय त्याच्या विरोधात पाच गुन्हेगारी प्रकरणं प्रलंबित असल्याचंही त्याने अर्जात नमूद केलं आहे. 

मागे

लोकसभा निवडणुकीत संजय निरूपमला मनसे कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही.
लोकसभा निवडणुकीत संजय निरूपमला मनसे कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही.

मराठीचा   द्वेष करणाऱ्या आणि महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय न....

अधिक वाचा

पुढे  

‘मत कोणाला देत आहोत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे बघितल्याशिवाय मत देऊ नका’- उद्धव ठाकरे
‘मत कोणाला देत आहोत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे बघितल्याशिवाय मत देऊ नका’- उद्धव ठाकरे

व्यासपीठावरून शाब्दीक फटकारे लगावत फोटो, व्हीडिओ, पुराव्या यांच्यासहित भा....

Read more