By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८० व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यांचा हा वाढदिवस महाराष्ट्राच्या बळीराजाला कृतज्ञता दिवस म्हणून समर्पित करण्यात आला. यासाठी राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेला ८० लाख रुपयांचा निधीचा बळीराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात येणार आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यार येणार आहे असे सांगितले आहे.
यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले की, ८० लाखांचा धनादेश दिला आहे. हा निधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जमा केला आहे. ज्या शेतकरी कुटूंब प्रमुखाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या समस्येमुळे आत्महत्या केली आहे त्या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरावी. यातील रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावे 'फिक्स डीपॉझिट' केली जाईल. त्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत, अशी भूमिका यामागे आहे.
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला जर कोणता उत्कृष्ट मुख्यमंत्री लाभला असेल तर ते म्हणजे राष्ट्रवाडी कोंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब..! आजही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जी वास्तू उभी आहे त्याची पायाभरणी साहेबांनी केली आहे. सर्वच क्षेत्रात साहेबांनी आपला ठसा उमटवला आहे”.
‘जो प्रश्न आपल्याला समजतही नाही त्या प्रश्नाची सोडवणूक करून शरद पवार मोकळे झालेले असतात. लातूर भूकंप, भूज भूकंप या आपत्तींमध्ये साहेबांनी संवेदनशील परिस्थिती योग्यरित्या हातळली. मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी काही तासात मुंबई पूर्ववत केली,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
“शरद पवार साहेबांची प्रतिभा आणि कार्य प्रचंड मोठे आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच साहेबांचा गौरव केला. वाजपेयी साहेब म्हणायचे की पवार साहब इतने आगे है क्यूंकी उनके साथ प्रतिभा है!,” अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली. “पवार साहेब नेहमीच आपल्या सहकार्यांच्या पाठिशी उभे राहतात. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी सर्वतोपरी मदत केली. तेव्हा ते म्हणाले होते की, भुजबळ आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाही. तेव्हा ते म्हणाले होते की, भुजबळ आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाही. सर्व काही संपलं असं वाटत होतं तेव्हा साहेबांनी पुनर्जन्म दिला,” असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत १२५ विरुद्ध १०५ मतांनी मंजूर झाले. १९५....
अधिक वाचा