By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकॉंग्रेस यांच्या महाआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे चित्र रंगविण्यात येत असतानाच आता या प्रयत्नांना खीळ घालण्याची कवि खेळी भाजपने केली आहे. भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतिपदाची ऑफर दिल्याचे कळते. त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात मंत्री पद देण्याची तयारीही दर्शविण्याचे म्हंटले जात आहे. म्हणजेच भाजप आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेऊन सत्तास्थापनेसाठी या ऑफर देवूक चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ १५९ होईल. म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऑफर स्वीकारली तर महाराष्ट्रात भाजपचा सत्ता स्थापनेचा हेतु साधा होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही सत्तास्थापनेबाबत सर्वंस्वी शरद पवार यांच्यावर विसंबून असल्याचे अलीकडच्या हालचालीतून स्पष्ट झाले आहे. मात्र अशा स्थितीत दोन वेळा दिल्लीत खुद्द शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. महाराष्ट्रात दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांच्या झालेल्या बैठका, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तीन वेळा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट, स्वता उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचाशी केलेली चर्चा या घटणांमुळे शिवसेना दोन्ही कॉंग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. मात्र दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या उलटसुलट विधांनामुळे ते शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविणार की काय, असा संशय व्यक्त होऊ लागला आहे. आता तर भाजपने पवारांना ऊफर दिल्याचे कळताच शिवसेचा धीर सुटत चालल्याचे पहायला मिळत आहे. याचाच परिणाम शिवसेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला लवकरात लवकर सरकार स्थापनेबाबत निर्णय घेण्यास संगितले असल्याचे म्हंटले जात आहे.
विधानसभा निवडणूकीत भाजप –शिवसेना महायुतीला बहुमत लाभले. परंतु शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत युतीत ठिणगी पडली. तर भाजप देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही राहिल्याने राज्यात सत्ता संघर्ष शिगेला पोचला दरम्यान राज्यपालांनी पहिल्या तीन पक्षांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देवून चाचपणी केली. पण हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापण्यास असमर्थ ठरल्याचे स्पष्ट होताच राज्यपालांनी राष्ट्रपति राजवटी शिफारस केली. केंद्र सरकारने या तत्काळ ही शिफारस मंजूर केली आणि राज्यात राष्ट्रपति राजवट लागू झाली. त्यालाही आता १० दिवस होऊन गेले तरी राज्यात सत्ता स्थापन होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान भाजपने शिवसेनेच्या डावपेचांना सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीलाच आपल्या जाळ्यात ओढण्याची खेळी केली आहे. शरद पवारांना २०२२ मध्ये राष्ट्रपतिपद केद्रात तीन मंत्रिपदे आली, राज्यात सत्तेत मोठा वाटा भाजप तयार असल्याचे गाजर दाखविण्यात आले आहे. जर ही ऑफर शरद पवार यांनी स्वीकारली तर मी परत येईन, ही देवेंद्र फडणवीस यांची इच्छाहीपूर्ण होईल. त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांचे स्वप्नभंग होऊन त्यांना शह दिसल्याचे समाधान भाजप नेत्यांना लाभले.
प्रश्न आहे तो शरद पवारांचा. पवार काय निर्णय घेतात त्यावर सर्व अवलंबून आहे. शरद पवारांना पंतप्रधान मोदी आपले राजकीय गुरु मानतात. शिवाय मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने त्यांना २०१७ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही केला. तथापि काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याने पवार आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा निवडणूकीत जोरदार प्रचार करून आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे भाजपची ऑफर शरद पवार स्वीकारतात की ठोकरतात यावरच आता राज्याच्या सत्तेचा तिढा सुटणार की वाढणार हे आता ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होईल, तरीही महाराष्ट्रात सत्ता स....
अधिक वाचा