ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 05:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी

शहर : मुंबई

समाजवादी पक्षाचे आमदार पार्टी आमदार अबू आझमी यांनी आज (30 सप्टेंबर) मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या आहेत. आझमी यांनी मानखुर्द येथील एस. एम. एस. कंपनी बंद करावी या मागणीसाठी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा देऊनही ते आमचं काम ऐकत नाही, साधा फोनही उचलत नाही, असा आरोप केला.

अबू आझमी म्हणाले, “आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा दिलाय, पण ते आमचं काम ऐकत नाहीत. आदित्य ठाकरे साधा फोनही घेत नाही.” अबू आझमी यांनी मानखुर्द येथील एस. एम. एस. कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. त्यासाठीच त्यांनी आदित्य ठाकरेंशी अनेकदा संपर्क केल्याचा दावा केला. मात्र, आदित्य ठाकरे त्यांच्या सरकारला आमचा पाठिंबा असतानाही आमचे साधे फोनही उचलत नसल्याची तक्रार आझमी यांनी केली आहे.

बाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी

अबू आझमी यांनी बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “आजचा दिवस पुन्हा एकदा भारतासाठी काळा दिवस आहे. बाबरी मशीद 1528 मध्ये बनवण्यात आली होती. 1949 मध्ये जबरदस्तीने मशिदीत मूर्ती ठेवण्यात आली. 1992 मध्ये ही मशीद पाडण्यात आली. हे सर्व जगाने पाहिलं आहे. जेव्हापासून केंद्रात मोदी सरकार आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, आयटी, पोलीस या संस्थांना केवळ खेळणं बनवून टाकलं आहे. अयोध्या जमिनीच्या प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मशीद पाडण्यात आली आणि तेथे मुर्ती ठेवण्यात आली हे चुकीचं झाल्याचं म्हटलं.”

इतकी मोठी मशीद तोडण्यात आली आणि आज त्याचा एकही पुरावा शिल्लक नाही. आता या देशात हेच होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून साध्वीला सोडण्यात आलं, पुरोहित यांनाही सोडण्यात आलं, मेजर उपाध्याय सुटले. माजी आयटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मेहनत करुन या प्रकरणात पुरावे गोळा केले. मात्र, उद्या हमंत करकरे अप्रमाणिक असल्याचा दावा केला जाईल. तसेच मोदी सरकारचं खेळणं झालेल्या एनआयएला खरं मानलं जाईल. जर या देशाचा हाच नियम असेल तर भविष्यात खूप अंधःकार आहे,” असं अबू आझमी यांनी सांगितलं.

मागे

babri Case | बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर
babri Case | बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर

बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षडयंत्र नव्हते, असं सांगत 32 लोकांना विशेष सीबीआ....

अधिक वाचा

पुढे  

आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या
आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळ....

Read more