ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पक्षादेश मान्यच, पण तिकीट का नाही ते कानात तरी सांगा - खडसे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पक्षादेश मान्यच, पण तिकीट का नाही ते कानात तरी सांगा - खडसे

शहर : मुंबई

भाजपच्या तिसऱ्या यादीतही माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव नसल्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्टच झाले आहे. तुम्हाला उमेदवारी द्यायची नाही, मात्र तुम्ही सांगाल त्याला देऊ, असे पक्षाने मला सांगितले आहे. पक्ष योग्य ताे निर्णय घेईलच. मात्र, मला उमेदवारी का नाही? हे पक्षाने सांगावे, कानात सांगितले तरी चालेल’, असे गुरुवारी कार्यकर्त्यांसमाेर बाेलताना खडसेंनी सांगितले. दरम्यान, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्जही घेतला आहे. मात्र, तिसऱ्या यादीत त्यांचेही नाव नव्हते.

गेल्या तीन दिवसांपासून मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थकांनी ठिय्या दिला आहे. नाथाभाऊ, पक्षाकडून तुमच्यावर अन्याय हाेत आहे, आता तुम्ही अपक्ष लढाअसे साकडे घातले जात आहे. त्यांच्या भावना खडसेंनी समजून घेतल्या. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खडसे म्हणाले, ‘गेल्या ४० वर्षांपासून भाजपचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जो आदेश दिला तो मला मान्य, अमान्य, कटू असला तरी तो मानला. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे सांगितले असता ताेही दिला. यापुढेही पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. मुक्ताईनगरमधून मीच उमेदवार असावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांना मी शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पक्ष माझ्या बाबतीत योग्यच निर्णय घेईल, असेही मी त्यांना सांगितले आहे. गेल्या तीन दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते माझ्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांनी खडसे यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती व त्यांनी पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष लढावे, असाही आग्रह धरला. मात्र, खडसेंनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

मागे

आदित्य विरुद्ध मनसेचा उमेदवार नाही, 'ऋणी' असल्याची उद्धव यांची भावना
आदित्य विरुद्ध मनसेचा उमेदवार नाही, 'ऋणी' असल्याची उद्धव यांची भावना

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी....

अधिक वाचा

पुढे  

जितेंद्र आव्हाड म्हणतात,”मयके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले”
जितेंद्र आव्हाड म्हणतात,”मयके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले”

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे दीपाळी सय्यद यांना उमेदवारी....

Read more