ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवभोजन थाळीसाठी 'आधार'ची गरज नाही - छगन भुजबळ 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 04:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवभोजन थाळीसाठी 'आधार'ची गरज नाही - छगन भुजबळ 

शहर : मुंबई

          मुंबई  -  येत्या २६ जानेवारीपासून राज्यात १० रुपयात थाळीचा लाभ ही योजना सुरू केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत होते. पण शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. शिवभोजन थाळीसाठी आधार कार्ड लागणार ही माहिती कुठून आली मला माहित नसल्याचे भुजबळांनी म्हटले. 

 

       शिवसेनेच्या संकल्पनेतूनच १० रुपयात थाळी ही योजनाही सुरू केली जात असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आहे. शिवभोजन योजना सध्या मुंबई ते ठाण्यात ३०-३२ ठिकाणी प्रायोगिक तत्वावर असणार आहे. यामध्ये मुंबईतील १५ ठिकाणांचा समावेश असून १० रुपयात थाळी केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून शहरी भागात ३५ रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. तथापि या शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. 

 

        शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या शिवथाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी,  १ मूद भात आणि १ वाटी वरण असेल. ही जेवणाची थाळी प्रत्येकाला दहा रुपयांना मिळणार आहे. दुपारी १२ ते २ या दोन तासात शिवथाळी उपलब्ध असेल. मुंबई शहर आणि उपनगरासाठी दिवसाला १९५० शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याला  २५०, ठाण्याला १३५०, औरंगाबादला ५००, पुण्याला १००० तर पिंपरी चिंचवडला ५०० थाळी मिळणार आहेत.

मागे

 ‘२४ तास मुंबई’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
‘२४ तास मुंबई’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

         मुंबई - अखेर मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू हो....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार  - संजय राऊत
उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार  - संजय राऊत

     मुंबई -  महाराष्ट्रात ठाकरे सरकार स्थिरस्थावर होत आहे. उद्धव ठाक....

Read more