By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - आज उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा लांबलेला शपथविधी पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यात विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरे मंत्री पदाची शपथ घेणार आहे. मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या बैठकीत आदित्य ठाकरे उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती आता मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर ते आपसूकच मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहू शकतात. मात्र त्या बाबतीत त्यांच्यावर टीका करता येणार नाही.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरे कँबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील. शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आदित्य ठाकरे यांची पर्यावरण किंवा उच्चशिक्षण मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना 13, राष्ट्रवादी 13 आणि काँग्रेसच्या 10 मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत मातोश्री वरूनच रिमोट कंट्रोल चालवून राजकारण केले मात्र, प्रत्यक्षात ते कधी निवडणुकीत किंवा मंत्रिमंडळात सहभागी झाले नव्हते. तथापि, यावेळी ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी या बाबतीत नवा इतिहास घडवला आहे.
मुंबई - महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मह....
अधिक वाचा