By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पूत्र, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतल्याचे माध्यमातून समजले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांना आदित्य ठाकरे भेटले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसापासून दिल्ली दौर्यावर आहेत. तसेच त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबूकच्या मुख्यालयाला भेट दिली असून, तेथील कर्मचार्यांशी गप्पा-गोष्टी मारल्या. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या या अचानक भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक क....
अधिक वाचा