ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नगर जिल्ह्यातील 30 कोटीच्या 3 प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यता - पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नगर जिल्ह्यातील 30 कोटीच्या 3 प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यता - पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर

शहर : मुंबई

वारंवार दुष्काळ पडत असल्याने निर्माण होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील मौजे धांदरफळ बु., मौजे जवळेकडलगमौजे निमगांव भोजापूर व इतर 3 गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेस मंत्रीमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौजे धांदरफळ बु.ता.संगमनेरजि.अहमदनगर नळ पाणी पुरवठा योजनेस 531.76 लक्ष (निव्वळ)व 573.14 लक्ष (ढोबळ)  इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमूद करण्यात आली आहे. यासाठी  उपलब्ध स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून मौजे धांदरफळ बु. नळ पाणीपुरवठा प्रस्तावित योजनेसाठी प्रवरा नदीच्या डाव्या तिरावर अस्तित्वात असलेल्या पाझर विहीर निवडण्यात आली आहे. प्रस्तावित येाजनेतून 40 लिटर प्रती माणसी पाणी  उपलब्ध होणार आहे.

मौजे जवळेकडलग नळ पाणी पुरवठा योजनेस रुपये 823.47 लक्ष (निव्वळ) व रुपये 888.29 लक्ष (ढोबळ) इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमुद करण्यात आली आहे. यासाठी उपलब्ध स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून जवळेकडलग गावाची लोकसंख्या तपासून साठवण तलाव नळपाणीपुरवठा योजनेसाठी घेण्यात आले आहे. तसेच प्रवरा नदीच्या डाव्या तिरावर विहीर हा स्त्रोत पाणीपुरवठ्यासाठी निवडण्यात आला आहे. नवीन प्रस्तावित योजनेतून 40 लिटर प्रती माणसी पाणी उपलब्ध होणार आहे.जवळेकडलग गाव प्रवरा नदीच्या तिरावर वसलेले असून प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा आर्वतन काळ संपल्यानंतर पाणी कमी पडते. गावाची वाढीव लोकसंख्या व वाडया वस्त्यांना पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे.

  मौजे निमगांवभोजापूर व इतर 3 गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस रुपये 1393.86 लक्ष (निव्वळ) व रुपये 1504.52 लक्ष (ढोबळ) किंमतीच्या अंदाजपत्रकास  शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी येथील अस्तित्वातील उपलब्ध स्त्रोतांद्वारे  नळ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असून या योजेनसाठी अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरणाची निवड करण्यात आली आहे. नवीन प्रस्तावित योजनेनुसार प्रती माणसी 40 लिटर एवढे पाणी उपलब्ध होणार आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सन  2019-20 च्या मंजूर कृती आराखड्यामध्ये या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

 

मागे

जलसंवर्धन आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर न करणे ही लोकचळवळ बनावी-उपराष्ट्रपती
जलसंवर्धन आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर न करणे ही लोकचळवळ बनावी-उपराष्ट्रपती

जलसंवर्धनासाठी आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकविरोधात लोकचळवळ बनवण्य....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद

येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर....

Read more