ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘अहो, सोमवारची वाट बघा’, गुणरत्ने सदावर्तेंचा इशारा, आता काय करणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 27, 2024 07:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 ‘अहो, सोमवारची वाट बघा’, गुणरत्ने सदावर्तेंचा इशारा, आता काय करणार?

शहर : मुंबई

मराठा समाजाला आज महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर आता वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "अहो, सोमवारची वाट बघा, लोकांना आपपाल्या घरी जाऊ द्या, सोमवारची वाट बघा" असं म्हटलय.

“मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?” अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा सुरुवातीपासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला विरोध राहिला आहे. “मराठा समाजातील विनोद पाटील यांच्यासारखी विद्वान माणस बोलली असती, तर मी समजू शकतो. पण मनोज जरांगे पाटील काय बोलतात, यावर पत्रकारांना टीआरपी मिळू शकतो अशा शब्दात गुणरत्ने सदावर्ते यांनी हल्लाबोल केला.

“ओपन, ओबीसी, भावांच्या जागा मी कमी होऊ देणाकर नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. कुणासोबत गैर होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. चुलत भावाला प्रमाणपत्र हवं असेल, तर प्रतिज्ञापत्र देण्याची कायद्यात तरतूद आहे. उच्च

न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर जे प्रतिबंध घातलेत ते पाळावे लागतात, कोण कितीही मोठा असला तरी? जरांगे पाटलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन केलय असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.

“ऐका हो ऐका, जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलय, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत, त्यांच्या बाबतीत आरक्षणाचा विचार करणं किती योग्य आणि किती अयोग्य असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जो अध्यादेश काढलाय, त्याला न्यायालयात आव्हान देणार का? या प्रश्नावर गुणरत्ने सदावर्ते यांनी “अहो, सोमवारची वाट बघा, लोकांना आपपाल्या घरी जाऊ द्या, सोमवारची वाट बघा असं उत्तर दिलं.

 

मागे

आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला वायदा पूर्ण
आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला वायदा पूर्ण

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण केल्या....

अधिक वाचा

पुढे  

‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणारच नाही, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा
‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणारच नाही, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

"मी मंत्री छगन भुजबळ यांना अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कुठल्याहीप्र....

Read more