ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात महाविकासआघाडीची सुप्रीम कोर्टात धाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात महाविकासआघाडीची सुप्रीम कोर्टात धाव

शहर : मुंबई

भाजपने अखेर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या या खेळीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.तिन्ही पक्षांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका दाखल केला आहे. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेणे आणि फडणवीस यांचा शपथविधी घेण्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये महाविकासआघाडीकडे पूर्ण बहुमत आहे, त्यासाठी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, या याचिकेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महाविकासआघाडीचा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी या याचिकेबद्दल साशंकता निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल जरी झाली तरी त्यावर तातडीने सुनावणी होणार नाही. जरी सुनावणी झाली तरी निर्णय यायला उशीर होईल, असा दावा अणेंनी केला आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापन करण्यावरून हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 11 आमदार फोडून भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि तातडीने देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीही उरकून टाकला. परंतु, आता राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार परत पक्षात परतले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. अजित पवारांच्या निर्णयावर अर्थातच यात चर्चा होणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ अजित पवारांना भेटले. अजित पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न या वेळी झाल्याचं समजतं. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांना फोन करून त्यांना भावनिक आवाहन केल्याची माहिती मिळते आहे. या दोघांमध्ये 6 मिनिटं चर्चा झाली. नेमकं काय बोलणं झालं याबाबत तपशील नाही. पण, अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीला जाणार नाहीत, असं स्पष्ट होत आहे. सुप्रिया सुळे यांनी चर्चा झाल्याचा इन्कार केल्याची साम टीव्हीची बातमी आहे.

अजित पवार अद्याप राष्ट्रवादीच्या बैठकीला आलेले नाहीत. ते येणार नाहीत, असं कळतं. धनंजय मुंडे यांचा फोन कालपासून बंद आहे. त्यांच्याशी माध्यमांचा संपर्क झालेला नाही. पण बैठकीच्या ठिकाणी धनंजय मुंडे हजर झाले आहे.

 

मागे

पुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे
पुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे

काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे. त....

अधिक वाचा

पुढे  

१७० हून अधिक मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकू - आशिष शेलार
१७० हून अधिक मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकू - आशिष शेलार

'छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं शिकवलं त्या....

Read more